---Advertisement---

इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?

On: शुक्रवार, मार्च 10, 2023 7:31 PM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाला लाभलेल्या दिग्गज कर्णधारांमध्ये एमएस धोनी याची गणना होते. धोनीने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी भारताला जिंकून दिल्या आहेत. त्यामध्ये 2007चा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे. धोनीबाबत बोलायचं झालं, तर एखाद्या बॉलिवूड कलाकाराला नसेल, इतका मोठा चाहतावर्ग धोनीचा आहे. विशेषत: जेव्हा साऊथच्या लोकांची गोष्ट असते, तेव्हा ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे तर सर्वांनाच माहिती आहे की, सिने सुपरस्टारची मंदिरे बांधली जातात. मात्र, आता साऊथच्या धोनीप्रेमीबाबत एक नवीन गोष्ट समोर येत आहे.

खरं तर, एमएस धोनी (MS Dhoni) याच्या एका चाहत्याने सर्व हद्द पार केली आहे. त्याने त्याच्या लग्नाच्या पत्रिकेवर धोनीचा फोटो छापला आहे. ही पत्रिका जेव्हा कर्नाटक धोनी फॅन्स असोसिएशनने शेअर केली, तेव्हा ही पत्रिका काही क्षणातच व्हायरल झाली. आता सोशल मीडियावरही या पत्रिकेवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकाने कमेंट करत लिहिले की, “लग्नाचे श्रेयदेखील धोनीलाच मिळाले पाहिजे.”

दुसऱ्या एकाने लिहिले की, “भविष्यातील कोणताही क्रिकेटपटू सचिन आणि धोनीसारखी क्रेझ मिळवू शकत नाही.”

https://twitter.com/Eighty7_58/status/1634116188912361474?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1634116188912361474%7Ctwgr%5E288f61eb73f4cdeb14a8e42139db6b099fee49e4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fthats-how-fans-reacts-as-ms-dhoni-fans-prints-mahi-pic-on-his-marriage-card-hindi-3849321

आणखी एकाने लिहिले की, “त्यामुळेच एमएस धोनी हा सर्वकालीन सर्वोत्तम आहे.”

याव्यतिरिक्त एकाने धोनीची क्रेझ दाखवली आहे. त्याने लिहिले आहे की, “कर्नाटकमधील धोनीची क्रेझ.”

आयपीएलमध्ये दिसणार ‘थाला’
एमएस धोनी हा ‘थाला’ या नावानेही ओळखला जातो. धोनी आता आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे नेतृत्व करत आहे. असे म्हटले जात आहे की, हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. धोनीने चेन्नईला तब्बल 4 वेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. त्याने 2010, 2011, 2018 आणि 2021 या हंगामात चेन्नईला चॅम्पियन बनवले आहे. मात्र, धोनी काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (thala ms dhoni fans prints mahi pic on his marriage card)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोक म्हणतात, संजू देवाचं गिफ्ट आहे, पण वास्तवात तो…’, माजी दिग्गजाची सॅमसनच्या चाहत्यांना चपराक
अहमदाबादमध्ये अश्विनने एक नाही, तर नावावर केले हे तीन मोठे विक्रम, ऑस्ट्रेलियाची मोठी आघाडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---