Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमएस धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

एमएस धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

March 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
MS-Dhoni

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाच्या माजी दिग्गज खेळाडूंबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एमएस धोनी, सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या नावाने बँकेची फसवणूक करणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (दि. 3 मार्च) पर्दाफाश केला. ही टोळी क्रिकेटपटू आणि सिने कलाकारांच्या माहितीचा वापर करून बँकेची फसवणूक करत होती. या टोळीने एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि आलिया भट्ट यांच्या नावावर बँकांची 50 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे.

दिल्ली पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
खरं तर, पोलीस दीर्घ काळापासून या टोळीच्या मागावर होते. दिल्ली पोलीस (Delhi Police) डीसीपी शाहदरा, रोहित मीन यांनी सांगितले की, “दिल्ली पोलिसांनी एमएस धोनी, अभिषेक बच्चन, सोनम कपूर, सचिन तेंडुलकर, सैफ अली खान, ऋतिक रोशन, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी आणि अन्य कलाकारांच्या माहितीचा वापर करून बँकांची 50 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.”

ANI

माध्यमांतील वृत्तांनुसार, या टोळीने बँकांची फसवणूक करण्यासाठी 95 प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे बनावट सरकारी ओळखपत्र बनवले. सर्व आरोपींना माहिती तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आहे.

आयपीएलच्या तयारीसाठी धोनी चेन्नईत दाखल
दुसरीकडे, एमएस धोनीबाबत बोलायचं झालं, तर तो 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धांच्या तयारीला लागला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी गुरुवारी (दि. 2 मार्च) चेन्नईत पोहोचला. चार वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला चेन्नई संघ आगामी हंगामासाठी शुक्रवारपासून (दि. 3 मार्च) एम. ए. चिदंबरम स्टेडिअममध्ये प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करेल. धोनीसोबतच अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू हेदेखील या शिबिराचा भाग असतील.

विशेष म्हणजे, फ्रँचायझीने आयपीएल 2023साठीच्या मिनी लिलावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन यांना ताफ्यात सामील केले आहे. अशात हे जबरदस्त खेळाडू चेन्नईला पाचव्यांदा विजेतेपद जिंकून देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (big breaking about ms dhoni read what happened here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला पराभूत केल्यानंतर स्टीव स्मिथची मोठी प्रतिक्रिया, नियमित कर्णधार पॅट कमिन्सचा उल्लेख करत म्हणाला…
मायदेशातील कसोटीत भारताची जबरदस्त आकडेवारी, फक्त तिसऱ्यांदा आलीये मान खाली घालण्याची वेळ


Next Post
Rohit Sharma

ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाल्यानंतर रोहित शर्माने पाकिस्तानला केले ट्रोल! नेमकं काय म्हणाला भारतीय कर्णधार?

Lionel-Messi-35-Gold-Iphone

फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मेस्सी वाटतोय गोल्ड आयफोन, जाणून घ्याच

Photo Courtesy: Twitter/Hockey India

भारतीय हॉकी संघाला मिळाले नवे प्रशिक्षक! बेल्जियमला मिळवून दिलाय वर्ल्डकप आणि ऑलिम्पिक गोल्ड

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143