ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. शुक्रवारी (3 मार्च) ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यातील पहिला विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन संघ आणि त्यांचे माजी खेळाडू हा दौरा सुरू होण्याआधीच भारतीय खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करताना दिसत होते. उभय संघांतील मालिका सुरू झाल्यानंतरी वारंवार फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. याच पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार रोहित शर्मा संतापला. यावेऱी रोहितने अप्रत्यक्षपणे पाकिस्तान संघावर निशाणा साधला.
भारत आणि ऑसट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला गेला. हा सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळला गेला असून भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा फायदा भारताने पुरेपूर घेतला. पण तिसऱ्या सामन्यात मात्र हीच फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी भारताला महागात पडली. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी जबरदस्त प्रदर्शन करत भारताला 9 विकेट्सने मात दिली. इंदोरमध्ये खेळलेल्या तिसऱ्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) माध्यमांशी बोलत होता.
यावेळी रोहितला पत्रकारांनी पुन्हा एकदा खेळपट्टीविषयी प्रश्न विचारला. उभय संघांतील तिन्ही कसोटी सामने तिसऱ्याच दिवशी निकाली निघाल्यामुळे हा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देत रोहित म्हणाला, “कसोटी सामना पाच दिवस खेळला जाण्यासाठी खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले पाहिजे. भारताच्या बाहेरही कसोटी सामना पाच दिवस चालत नाहीये. नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला सामना तीन दिवसांच्या आत संपला. पाकिस्तानचे लोक म्हणत आहे की हे सामने कंटाळवाणे होत आहेत. त्यामुळे आम्ही हे सामने रोमांचक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
“लोक भारतीय खेळपट्टीवरच एवढे प्रश्न का विचारतात? मला असे प्रश्न का विचार जात नाही की, नाथन लायन याने किती चांगली गोलंदाजी केली, चेतेश्वर पुजाराने आणि उस्मान ख्वाजा यांनी किती चांगली फलंदाजी केली. आपण खेळपट्टीवर खूप जास्तच लक्ष देत आहोत,” असे रोहित पुढे म्हणाला. (IND vs AUS Rohit Sharma trolls Pakistan team after Indore Test defeat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला पराभूत केल्यानंतर स्टीव स्मिथची मोठी प्रतिक्रिया, नियमित कर्णधार पॅट कमिन्सचा उल्लेख करत म्हणाला…
मायदेशातील कसोटीत भारताची जबरदस्त आकडेवारी, फक्त तिसऱ्यांदा आलीये मान खाली घालण्याची वेळ