भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदोर कसोटीचा निकाल शुक्रवारी (3 मार्च) लागला. भारतीय संघाला भारतात येऊन कसोटी सामन्यात पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपी राहिली नाहीये. मात्र, ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटीत तब्बल 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर हा मायदेशातील कसोटीत भारताचा मागच्या 10 वर्षातील केवळ तिसरा पराभव आहे.
भारतीय संघाने मागच्या 10 वर्षात मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये केलेले प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. मार्च 2013 पासून आतापर्यंत भारताने मागदेशातील 43 कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी फक्त 34 सामने संघाने जिंकले आहेत. 6 सामने अनिर्णित राहिले असून अवघ्या तीन सामन्यांती भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या तीन सामन्यांतील एक म्हणजेच 1 मार्च रोजी सुरू झालेला इंदोर कसोटी सामना. यापूर्वी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला असताना पुणे कसोटी सामन्यात पाहुण्यांनी भारताला पराभूत केले होते. त्यानंतर 2021 साली इंग्लंडविरुद्ध चेन्नईत खेळलेल्या कसोटी सामन्यातही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. मायदेशातील मागच्या 10 वर्षातील तिसरा पराभव भारताला शुक्रवारी पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळाला. यादरम्यानच्या काळात भारत फक्त ऑस्ट्रेलियाकडून दोन वेळा पराभूत झाला आहे.
मागच्या 10 वर्षात भारताला भारतातील कसोटी सामन्यात पराभूत करणारे संघ
2017 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पुणे)
2021 विरुद्ध इंग्लंड (चेन्नई)
2023 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (इंदोर)
दरम्यान, उभय संघांतील या इंदोर कसोटीचा एकंदरीच विचार केला, तर ऑस्ट्रेलियाचे पारडे पहिल्या दिवासापासूनच जड दिसत होते. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने 109 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या डावात 197 धावा केल्या. दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ 88 धावांनी पिछाडीवर होता. दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण अवघ्या 163 धावांवर संघ सर्वबाद झाला. अशात विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्या गाठले आणि सामना नावावर केला. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामन्या ऑस्ट्रेलिया एक डाव आणि 132 धावांनी पराभूत झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने भारतानेच विजय मिळवला होता.
(IND vs AUS 3rd test list of Teams to Beat India at their Home in Last 10yrs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! कसाबसा अंपायर सायमन टफेल यांनी आपला प्राण वाचवला
कांगारुंचे कमबॅक! इंदोर कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी सकाळीच लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये