नागपूर आणि दिल्ली कसोटी काबीज केल्यानंतर भारतीय संघ इंदोर कसोटी सामन्यातही विजय मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा हा प्रयत्न हाणून पाडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 9 विकेट्सने नमवले. पाच दिवसांचा हा सामना तीनच दिवसात निकाली लागला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी तिसऱ्या दिवशी 76 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान त्यांनी 18.5 षटकातच गाठले आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. असे असले, तरीही भारताच्या चेतेश्वर पुजारा याचा खास पुरस्काराने गौरव करण्यात आला.
भारतीय संघाने पहिल्या डावात 109 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या पहिल्या डावात 197 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. पुजाराने 142 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या डावात पुजाराने 5 चौकारांव्यतिरिक्त 1 शानदार षटकारही मारला होता. हा त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 16वा षटकार होता. या षटकाराच्या मदतीने पुजारा 1 लाख रुपयांचा सर्वात मजबूत परफॉर्मरचा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला.
Stumps on Day 2⃣ of the third #INDvAUS Test.@cheteshwar1 top-scores for #TeamIndia 🇮🇳 with a magnificent 59 (142) 👏🏻👏🏻
We will be back with Day three action tomorrow as Australia need 76 runs in the final innings.
Scorecard – https://t.co/t0IGbs2qyj @mastercardindia pic.twitter.com/m0xdph0GeA
— BCCI (@BCCI) March 2, 2023
खरं तर, पुजाराच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आहे, ज्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी 2014मध्ये ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने षटकार मारला होता. त्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
पुजाराने त्याच्या अर्धशतकामध्ये जो एकमेव षटकार मारला, तो 79 मीटर दूर जाऊन पडला. पुजाराचा हा षटकार पाहून भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत इतर भारतीय खेळाडूही हैराण झाले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेतील पुजाराच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला आतापर्यंत फक्त एकच अर्धशतक करता आले आहे. या मालिकेत 5 डावांमध्ये तो 3 वेळा दहा धावांचा आकडाही पार करू शकला नाहीये.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1ने आघाडीवर आहे. अशात चौथ्या कसोटीत भारताने विजय मिळवला, तर संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. (cricketer cheteshwar pujara wins 1 lakh award for hitting the longest six in the match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाल्यानंतर रोहित शर्माने पाकिस्तानला केले ट्रोल! नेमकं काय म्हणाला भारतीय कर्णधार?
भारताला पराभूत केल्यानंतर स्टीव स्मिथची मोठी प्रतिक्रिया, नियमित कर्णधार पॅट कमिन्सचा उल्लेख करत म्हणाला…