---Advertisement---

WC Final: मोहम्मद कैफचा वॉर्नरने घेतला समाचार, नको ते बोलणं पडलं भलतंच महागात; म्हणाला, ‘याला फायनल…’

On: गुरूवार, नोव्हेंबर 23, 2023 11:39 AM
Mohammad-Kaif-And-David-Warner
---Advertisement---

David Warner To Mohammad Kaif: ऑस्ट्रेलिया संघाने 19 नोव्हेंबर रोजी विजयी पताका फडकावली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत केले. तसेच, सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब जिंकला. भारताने या स्पर्धेतील सलग 10 सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तसेच, ऑस्ट्रेलियाने सलग 2 पराभवांनंतर विजयी संघाच्या रूपात स्पर्धेचा शेवट केला. अशात भारताच्या पराभवानंतर मोहम्मद कैफ याने मोठे विधान केले होते, ज्यावर डेविड वॉर्नर याने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला वॉर्नर?
मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने म्हटले होते की, भारतीय संघ विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामना गमावूनही ‘कागदावर सर्वोत्तम संघ’ आहे. अशात या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याने बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) म्हटले की, “जेव्हा महत्त्व असते, तेव्हा तुम्हाला प्रदर्शन करावे लागले.”

कैफचे विधान
अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात (World Cup 2023 Final) 6 विकेट्सने भारताला पराभूत केल्यानंतर कैफ स्टार स्पोर्ट्सशी बोलताना व्यक्त झाला. त्याने म्हटले की, “मी कधीच स्वीकारू शकत नाही की, सर्वोत्तम संघाने विश्वचषक जिंकला आहे.” तो म्हणाला, “भारतीय संघ कागदावर सर्वोत्तम संघ आहे.”

वॉर्नरचे ट्वीट
अशात ऑस्ट्रेलियासाठी स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणाऱ्या वॉर्नरने कैफच्या विधानाचे उत्तर देताना म्हटले की, कागदावरील प्रदर्शन महत्त्वाचे नसते. तसेच, मैदानावर ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रदर्शन करायचे असते. वॉर्नरने एक्सवर (ट्विटर) लिहिले की, “मला एमके (मोहम्मद कैफ) आवडतो. समस्या ही आहे की, कागदावर काय आहे, हे महत्त्वाचे नाहीये. शेवटी जेव्हा महत्त्व असते, तेव्हा तुम्हाला प्रदर्शन करायचे असते. म्हणूनच याला फायनल म्हणतात. याच दिवसाचे महत्त्व असते आणि निकाल कोणत्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतो, हाच खेळ आहे.”

https://twitter.com/davidwarner31/status/1727267136568250501?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1727267136568250501%7Ctwgr%5E7d2321b620cdba077510b5695b0d60ab56019eb5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket-news%2Fclash-between-david-warner-and-mohammad-kaif%2F

ऑस्ट्रेलियासाठी वॉर्नरच्या सर्वाधिक धावा
डेविड वॉर्नर याचे विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रदर्शन पाहिले, तर त्याने 11 सामने खेळताना 48.63च्या सरासरीने 535 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 2 अर्धशतकेही निघाली आहेत. 163 ही वॉर्नरची विश्वचषकातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. (cricketer david warner disagrees with mohammad kaif on world cup best team )

हेही वाचा-
दोन वर्षात 9 कॅप्टन, टीम इंडियाने 2021 पासून ‘या’ खेळाडूंना दिली कर्णधारपदाची संधी; पाहा यादी
INDvsAUS T20 मालिकेतील पहिला सामना कुठे, कधी आणि कसा पाहता येईल? सर्व माहिती एकाच क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---