---Advertisement---

World Cup Final नंतर वानखेडे स्टेडियम चर्चेत! नरेंद्र मोदी स्टेडियमला झुकते माप देत असल्याचे…

---Advertisement---

रविवार (दि. 19 नोव्हेंबर) हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरला. भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6 व्यांदा विश्वचषक विजेता बनला. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. मात्र, या मैदानावर भारतीय संघाला पुरेसा पाठिंबा मिळाला नसल्याचे बोलले जात आहे.

हा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळायला गेला. प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या ठिकाणी तब्बल 1 लाख 32 हजार प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. अंतिम सामन्यात भारतीय संघाने अपेक्षित कामगिरी केली नसली तरी, चाहते यादरम्यान अत्यंत शांत असल्याचे दिसून आले.

https://twitter.com/BhavikaKapoor5/status/1726437303227388363?t=RrTjF6fewlBBB3gIjI9NSg&s=19

भारतीय कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली हे वारंवार प्रेक्षकांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करत होते. मात्र, तरीदेखील प्रेक्षकांकडून तशी दाद मिळत नव्हती. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू व समालोचक नासीर हुसेन याने देखील या मैदानावरील प्रेक्षक अत्यंत शांत होते, असे म्हटले. तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने देखील प्रेक्षक काहीच शांत असल्यामुळे आम्हाला चांगला खेळ करायला वाव मिळाला अशी प्रतिक्रिया दिली.

अहमदाबाद येथे भारतीय संघाला पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने, अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर हा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात यायला हवा होता असे म्हटले. मुंबई अथवा कोलकात्यातील जाणकार प्रेक्षक यांनी भारतीय संघाला जोरदार प्रतिसाद दिला असता असे यावेळी म्हटले गेले. यापूर्वी झालेल्या 2011 वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबई येथेच खेळविण्यात आला होता.

(Social Media Fans Said Wankhede Stadium Is Better Venues For ODI World Cup Final Than Narendra Modi Stadium Ahmedabad)

हेही वाचा-
World Cup Final मध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन, ड्रेसिंग रूममध्ये पोहचून… 
World Cup गमावला तरी ICC ने केला रोहितचा सन्मान, इतर 5 भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान, वाचा सविस्तर 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---