---Advertisement---

World Cup गमावला तरी ICC ने केला रोहितचा सन्मान, इतर 5 भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान, वाचा सविस्तर

---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषक किताब आपल्या नावावर केला. यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारताचे तब्बल सहा खेळाडू सामील आहेत.

https://www.instagram.com/p/Cz26IDivKBX/?igshid=MzRlODBiNWFlZA==

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या या संघाचा कर्णधार म्हणून भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला स्थान मिळाले. या विश्वचषकात भारतीय संघासाठी सलामी देताना तब्बल 597 धावा काढल्या. या संघात सलामीचा त्याचा साथीदार दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन  डी कॉक असेल. त्याने आपल्या अखेरच्या विश्वचषकात 694 धावा बनवल्या. या विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर भारताच्याच विराट कोहली याची वर्णी लागली. त्याने विश्वचषकात सर्वाधिक 765 धावा बनवल्या आहेत.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1726488949810700724?t=X3VBsPt7mSqElJzRkbG9MA&s=19

या संघात चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे न्यूझीलंडचा डेरिल मिचेल (552 धावा) व भारताचा केएल राहुल (452 धावा) हे दिसतील. राहुल संघाचा यष्टीरक्षक देखील असेल. अष्टपैलू म्हणून या संघात भारताचा रवींद्र जडेजा व विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांची वर्णी लागली आहे.

या संघातील एकमेव प्रमुख ‌फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाचाच ऍडम झम्पा (23 बळी) आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरला. तर, वेगवान गोलंदाजीची धुरा भारताचा मोहम्मद शमी (24 बळी), श्रीलंकेचा दिलशान मधुशंका (21 बळी) व भारताचाच जसप्रीत बुमराह (20 बळी) हे सांभाळतील. दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज ‌गेराल्ड कोएत्झे हा बारावा खेळाडू असेल. या संघात पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान व नेदरलँड्स यांचा एकही खेळाडू स्थान बनवू शकला नाही.

(ICC Annouced Team Of The ODI World Cup 6 Indians There Rohit Lead)

हेही वाचा-
पराभवानंतर खचलेल्या भारताचा गंभीरने वाढवला कॉन्फिडन्स; ट्वीट करत म्हणाला, ‘मी आधीच म्हणालोय आपण…’
‘तुझं रडणं मनाला लागलं, पण तू…’, रोहितचा मान खाली घालून चालतानाचा व्हिडिओ पाहून हळहळला चाहता; पाहा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---