वनडे विश्वचषक 2023 मध्ये अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताच्या मजबूत फलंदाजीविरुद्ध शिस्तबद्ध गोलंदाजी करत भारताचा डाव 240 पर्यंत मर्यादित ठेवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपले पहिले तीन बळी केवळ 50 धावांमध्ये गमावले. पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजीला उतरलेल्या मार्नस लॅब्युशेन याला चांगले स्लेज केले.
Virat Kohli continuously staring to Marnus Labuschagne! 😭😭pic.twitter.com/A4sq26aqbq
— Sayam Ahmad (@sayam_ahmad_) November 19, 2023
विजयासाठी केवळ 241 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या षटकात वेगवान सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पुढील सहा षटकात त्यांनी आपले तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर लॅब्युशेन फलंदाजीसाठी उतरला. त्याने मैदानावर पाऊल ठेवताच भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने त्याला स्लेज केले. तो खेळपट्टीवर येत असताना विराट टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करताना दिसला. तसेच त्याला काहीतरी चिडवत देखील होता. यानंतर पुढील षटकात त्याने पुन्हा एकदा त्याला खिजवले.
लॅब्युशेन हा क्षेत्ररक्षण करत असताना नेहमीच फलंदाजांशी अशा प्रकारे बोलून त्यांचे एकाग्रता भंग करत असतो. या विश्वचषकात तो आपल्या फलंदाजीने फारसे योगदान देऊ शकला नसला तरी, क्षेत्ररक्षण करताना त्याने अनेक महत्त्वपूर्ण झेल तसेच धावबाद केले आहेत.
(Virat Kohli Sledge Marnus Labuchagne In ODI World Cup Final)
हेही वाचा-
“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप
भारतीयांचा हार्ट ब्रेक! World Cup Final मध्ये अर्धशतकानंतर कोहली तंबूत, आता अपेक्षा राहुलकडून