वनडे विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या या सामन्यात भारतीय संघ काहीसा अडचणीत आलेला दिसला. भारतीय संघाने पहिल्या 11 षटकात तीन बळी गमावल्यानंतर विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताला पुनरागमन करून दिले होते. विराटने एक शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर तो लगेच बाद झाला.
WELL PLAYED, KING KOHLI…!!!!
54 (62) with 4 fours – a century in the Semis and now a fifty in the Final. The clutch King of world cricket. pic.twitter.com/JGofVdS1SL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय संघाला रोहित शर्मा याने जोरदार सुरुवात दिली. त्याने केवळ 31 चेंडूंमध्ये 47 धावा बनवल्या. मात्र, शुबमन गिल व श्रेयस अय्यर कपाशी ठरले. त्यानंतर राहुल व विराट यांनी अर्धशतकी भागीदारी केली. विराटने यादरम्यान स्पर्धेतील आपले सहावे अर्धशतक पूर्ण केले.
विराट भारतीय संघाला दीडशे पार घेऊन जात असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याचा त्रिफळा उडवत भारताला चौथा धक्का दिला. त्याने बाद होण्यापूर्वी 63 चेंडूंमध्ये 54 धावा केल्या. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. या विश्वाच्याच कातवीर आठ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने तीन शतके व सहा अर्धशतके ठोकली आहेत.
(Virat Kohli Departs After Fine Fifty In ODI World Cup Final Against Australia)
हेही वाचा-
IND vs AUS: Finalपूर्वी शुबमन गिलच्या आजीची आपल्या पतीला ताकीद; म्हणाल्या, ‘एकदा मॅच चालू झाली की…’
चॅम्पियन भारतच! World Cup Final साठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन्सचीही टीम इंडियाला पसंती