वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अखेरीस आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यात लढणार आहेत. या अंतिम सामन्यासाठी संपूर्ण क्रिकेटविश्व तयार असून, अनेक जण विजेता कोण होणार याबाबतचे अंदाज व्यक्त करत आहेत. विश्वचषकाचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीनेदेखील याबाबत आपल्या तज्ञांचे मत जाणून घेतले. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या देखील माजी खेळाडूंनी भारतालाच पसंती दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने या संपूर्ण विश्वचषकात दमदार कामगिरी करताना दहा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने देखील खराब सुरुवातीनंतर योग्य मार्गावर येत सलग 8 विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांची नजर लागली आहे.
या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीने देखील आपल्या समालोचक व तज्ञांना याबाबत विचारले. यामध्ये जवळपास सर्वांनीच भारतीय संघाला पसंती दिली. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, गौतम गंभीर व संजय बांगर यांनी भारत या विश्वचषकाचा विजेता असेल असे म्हटले. तर वेस्ट इंडीजचे दिग्गज ईयान बिशप्स यांनी देखील भारतालाच पसंती दिली आहे. इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाला 2015 मध्ये वनडे विश्वचषक मिळवून देणारे ऍरॉन फिंच व शेन वॉटसन हेदेखील भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हणतात.
सध्या भारतीय संघातील सर्वच खेळाडू दमदार फॉर्ममध्ये असून तीन खेळाडूंनी 500 पेक्षा जास्त धावा केल्या. तसेच दोन खेळाडू 300 पेक्षा जास्त धावा बनवण्यात यशस्वी ठरले आहेत. तर भारताच्या पाचही गोलंदाजांनी 13 पेक्षा जास्त बळी मिळवत आपला दबदबा राखला आहे.
(Former Australian Cricketers Shane Watson And Aaron Finch Said India Favourites In ODI World Cup Final)
हेही वाचा-
‘भारताने पहिली बॅटिंग केली, तर संपलं सगळं…’, CWC 2023 Finalच्या एक दिवसाआधी दिग्गजाची भविष्यवाणी
WHOOP: सचिनचा विक्रम मोडताना विराटच्या मनगटावर होते ‘हे’ खास फिटनेस बँड, फीचर्स पाहून चकितच व्हाल