भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारताने उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. या सामन्यादरम्यान अनेक विक्रम मोडले गेले. विराट कोहली याने वनडे क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक करत सचिन तेंडुलकर याचा खास विक्रम मोडला. यादरम्यान विराटचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये त्याने हातावर काहीतरी बांधले होते.
नेमकं काय आहे Whoop?
विराट कोहली (Virat Kohli) याच्या हातावर दिसणारी वस्तू घड्याळ नाहीये. खरं तर, हे एक फिटनेस बँड आहे. मात्र, हे फिटनेस बँड इतर कोणत्याही फिटनेस बँड किंवा ट्रॅकरपेक्षा खूपच वेगळे आहे. हे फिटनेस बँड व्हूप (Fitness Band Whoop) या ब्रँडचे आहे, जे सध्या भारतात लाँचदेखील झाले नाहीये. बाजारात अनेक प्रकारचे स्मार्ट वॉच आहेत, पण हे जरा वेगळ्या प्रकारचे बँड आहे. या बँडला Whoop नावाच्या कंपनीने लाँच केले आहे. हे फिटनेस ट्रॅकर बँड इतर सर्व बँडपेक्षा वेगळे आहे. कारण, यामध्ये कोणताही डिस्प्ले नाहीये.
विल अहमद व्हूप कंपनीचे सीईओ आणि संस्थापक आहेत. त्यांनी याची सुरुवात 2015मध्ये केली होती. त्यांनी आपला पहिला व्हूप 1.0 फिटनेस बँड लाँच केले होते. 2021मध्ये कंपनीने बँडचे 4.0 व्हर्जन लाँच केले होते. व्हूपने अलीकडेच ओपनएआयशी भागीदारी केली. त्यानंतर त्यांनी व्हूप लाँच केले.
https://twitter.com/willahmed/status/1706815900165296608?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1706815900165296608%7Ctwgr%5E671ca1d987748e77c605bf301a37e83ab691aeb1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Ftechnology%2Ftech-news%2Fstory%2Fwhoop-fitness-band-on-virat-kohli-wrist-during-ind-vs-nz-match-what-is-it-ttec-1819853-2023-11-16
व्हूप ट्रॅकर बँडचे फीचर्स
हा एक पट्टा असून त्यात 5 सेन्सर असतात, जे डेटाचे मोजमाप करतात. ट्रॅकर बँडमध्ये बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी तब्बल 5 दिवस चालते. हूपचा दावा आहे की, हूप बँडद्वारे ट्रॅक केलेला आरोग्य आणि फिटनेस डेटा 99 टक्के अचूक आहे. हा बँड युजरला रिअल टाइम स्ट्रेस स्कोअरही देतो आणि रिकव्हरी फोकस ट्रॅकर आहे.
हे ऍथलिट्सला हेदेखील सांगते की, त्यांच्या शरीरात कशाप्रकारच्या सुधारणेची गरज आहे. तसेच, खेळादरम्यान त्यांच्या शरीराची प्रदर्शन करण्याची क्षमता काय आहे. या व्हूप बँडमध्ये स्लीप कोच सुविधाही आहे. स्लीप कोच फिचर शरीराला आपल्या सर्वोत्तम क्षमतेने काम करण्यासाठी आवश्यक झोपेच्या वेळेविषयीही सांगते.
https://twitter.com/willahmed/status/1718989386207945152?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1718989386207945152%7Ctwgr%5E671ca1d987748e77c605bf301a37e83ab691aeb1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Ftechnology%2Ftech-news%2Fstory%2Fwhoop-fitness-band-on-virat-kohli-wrist-during-ind-vs-nz-match-what-is-it-ttec-1819853-2023-11-16
किंमत किती?
डिस्प्ले नसलेले हे फिटनेस ट्रॅकर बँड सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. Whoop 4.0 हार्ट रेट, शरीराचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनची मात्रा आणि झोपेची वेळ सहजरीत्या ट्रॅक करू शकते. हे फिटनेस बँड प्रत्येक सेकंदाला 100 वेळा असा डेटा गोळा करतो. या बँडमध्ये डिस्प्ले नाहीये, पण हे सहजरीत्या 24 तास आणि 7 दिवस हातात घातले जाऊ शकते.
हे बँड झोप, दैनंदिन शरीराच्या ऊर्जेचा खर्च आणि रिकव्हरी ट्रॅक करते. 12 महिन्यांच्या सब्स्क्रिप्शनसह याची किंमत $239 (जवळपास 19 हजार रुपये) आहे. याची मासिक सदस्यता शुल्क $30 आहे आणि त्यात WHOOP ऍपचाही समावेश आहे, जे सर्व प्लॅटफॉर्म (डेस्कटॉप, iOS आणि Android) ला सपोर्ट करते. (cricketer virat kohli and other fitness athletes wear whoop fitness band which does not have a display)
हेही वाचा-
CWC 23 Final: भारताशी भिडण्याच्या 24 तासांपूर्वी कमिन्सने दिली धमकी! म्हणाला, ‘1.3 लाख क्राऊडला शांत…’
काय होतास तू काय झालास तू! इम्रान खान सोडून WC Finalसाठी सर्व विश्वविजेते कॅप्टन लावणार हजेरी, कारण धक्कादायक