वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अनेक दिग्गज मैदानात हजेरी लावणार आहेत. यात क्रीडाविश्वातील मोठ्या चेहऱ्यांसह बॉलिवूड स्टार्सचा समावेश असणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आतापर्यंतच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांना या सामन्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. पण आपल्या देशाला विश्वचषक जिंकवून देणारा एख दिग्गज कर्णधार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील थरार पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये उफस्थित राहू शकणार नाही.
क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात 1975 साली झाली होती. यावर्षी विश्वचषकाचा 13वा हंगाम खेळला जात आहे. भारतात आयोजित ही स्पर्धा आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली. रविवारी (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शेवट होईल. सोबतच 13वा विश्वचषकविजेता संघही मिळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विश्वचषकाच्या नियोजनामध्ये कुठेच कमी पडताना दिसले नाहीये. अंतिम सामन्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसीने आतापर्यंतच्या सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना आमंत्रित केले आहे. तसेच या सर्वांसाठी खास ब्लेझर देखील तयार असतील.
बीसीसीआयच्या या आमंत्रणानंतर भारताचा माजी दिग्गज एमएस धोनी आणि कपिल यांच्यासह सर्व विश्वचषक विजेते कर्णधार रविवारी अहमदाबादमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी कर्णधार इमरान खान या सामन्यासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. इमरान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने 1992 साली वनडे विश्वचषक जिंकला होता. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांना राजकारणाकडे वाट वळवली आणि देशाचे पंतप्रधान झाले. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पोलिसांकडून अटक देखील केली केली. अशात विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात त्यांना उपस्थित राहता येणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार त्यांनी या सामन्यासाठी जामीन देखील मागितला आहे, पण त्यांचा ही अपील फेटाळली गेली.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे विश्वचषक हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर दोन्ही संघांकडे एकापेक्षा एक खेळाडू आहेत. भारातने एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर सलग सात सामना विजय मिळवला आहे. उपांत्य सामन्यात भारताकडून न्यूझीलंडला 70 धावांनी पराभव मिळाला. तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. (All the World Cup winning captains will be present for the World Cup final, but Imran Khan will not be able to attend)
महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023: Player of the Tournament साठीचे सर्वात मोठे 9 दावेदार, विराटला सहकाऱ्यांकडून टक्कर
एमएसएलटीएच्या वतीने 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेचे आयोजन, भारतीय खेळाडूंना एटीपी गुण मिळवण्याची संधी