अवघे क्रिकेटविश्व वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आतुर झाले आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहेत. या सामन्याला आता 24 तासांहून कमी कालावधी उरला आहे. अशात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने मोठे विधान केले आहे. त्याच्या विधानावरून समजते की, ऑस्ट्रेलियाचे मनोबल खूपच उंचावले आहे.
अंतिम सामन्यापूर्वी कमिन्सची चेतावणी
खरं तर, विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 1 लाख 32 हजार प्रेक्षकसंख्येच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. त्याने या सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्या संघाचे लक्ष्य सांगितले. त्याने चेतावणी देणाऱ्या अंदाजात म्हटले की, भारतीय संघाला पराभूत करून अहमदाबादमधील सर्व प्रेक्षकांना शांत करू.
काय म्हणाला कमिन्स?
विश्वचषकात 10 सामन्यांपैकी फक्त 2 गमावत ऑस्ट्रेलियाने सलग 8 सामने जिंकले आहेत. अशात ते भारताविरुद्ध अंतिम सामन्यात भिडणार आहेत. सामन्याच्या एक दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना कमिन्स म्हणाला, “मला माहिती आहे की, उद्या गर्दी स्पष्टपणे एकतर्फी असेल. अशात 1.3 लाखांच्या गर्दीला शांत करण्यापेक्षा जास्त समाधान कशातच नाही. अंतिम सामन्यातही आमचे हेच लक्ष्य असेल.”
खरं तर, भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले 10 सामने जिंकले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाकडून कठोर आव्हान मिळेल. कारण, हा संघ कोणत्याही वेळी सामन्याची दिशा बदलू शकतो. जेव्हा साखळी फेरीत दोघांचा सामना झाला होता, तेव्हा भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला चांगलाच त्रास दिला होता. त्यावेळी भारताने पहिले तीन फलंदाज लवकर तंबूत परतले होते.
या सामन्यात भारतासाठी आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नेहमीच भारतीय फलंदाजांना त्रास दिला आहे. अशात भारतीय संघासाठी अंतिम सामना सोपा नसेल. (captain pat cummins statement ahead the world cup 2023 final)
हेही वाचा-
काय होतास तू काय झालास तू! इम्रान खान सोडून WC Finalसाठी सर्व विश्वविजेते कॅप्टन लावणार हजेरी, कारण धक्कादायक
World Cup 2023: Player of the Tournament साठीचे सर्वात मोठे 9 दावेदार, विराटला सहकाऱ्यांकडून टक्कर