---Advertisement---

World Cup 2023: Player of the Tournament साठीचे सर्वात मोठे 9 दावेदार, विराटला सहकाऱ्यांकडून टक्कर

Virat-Kohli
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा शेवटाकडे जात आहे. फक्त एकच दिवस आणि ही स्पर्धा संपून जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. अशात चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, या स्पर्धेचा ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ अर्थातच स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळेल. चालू विश्वचषकात तिन्ही विभागात खेळाडूंनी जबदरस्त कामगिरी केली आहे. अशात, सर्वोत्तम प्रदर्शनाच्या आधारावर आयसीसीने काही नावे सांगितली आहेत. चाहते इथे वोट करून आपला आवडता खेळाडू निवडू शकतात. चला तर, ती नावे आणि त्या खेळाडूंची कामगिरी पाहूयात…

विराट कोहली
यादीतील पहिले नाव भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचे आहे. विराट या स्पर्धेत एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. स्टार फलंदाजाने उपांत्य सामन्यात शानदार फलंदाजी करत स्पर्धेतील 700 धावांचा आकडा पार केला आहे. एवढंच नाही, तर त्याने शतक झळकावून सचिन तेंडुलकर याच्या वनडे क्रिकेटमधील शतकांचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकून सचिनच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. विराटने या स्पर्धेत 10 सामन्यात 101.57च्या सरासरीने 711 धावा केल्या. यात 3 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

ऍडम झम्पा
विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या प्रदर्शनाने चाहत्यांचे लक्ष वेधणारा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पा (Adam Zampa) होय. त्याने आपल्या प्रदर्शनाने टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. 31 वर्षीय झम्पाने त्याच्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने 10 सामन्यात 5.47च्या इकॉनॉमी रेटने 22 विकेट्स घेतल्या आहेत. तो स्पर्धेत 21.40च्या सरासरीने सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे.

https://twitter.com/ICC/status/1725748191461581100?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725748191461581100%7Ctwgr%5E3523e9c51b2b9becc66b05344ff316632dc84d20%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-virat-kohli-adam-zampa-quinton-de-kockplayer-of-the-tournament-odi-world-cup-2023%2F446160%2F

क्विंटन डी कॉक
दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य सामन्यापर्यंतच मजल मारता आली, पण संघाचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याचे जेवढे कौतुक करावे, तितके कमीच आहे. त्याने स्पर्धेत एकूण 10 सामने खेळले. त्यात त्याने 59.40च्या सरासरीने 594 धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे.

मोहम्मद शमी
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला सुरुवातीच्या काही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती, पण जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने कमाल केली. त्याने आतापर्यंत स्पर्धेत फक्त 6 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 6 डावात 5.01च्या इकॉनॉमी रेटने आणि 9.13च्या सरासरीने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत. तो विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे.

रचिन रवींद्र
स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याच्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती होते, पण जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली, तेव्हा त्याने आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाने सर्वांना दीवाना केले. रवींद्रने विश्वचषकात 10 सामने खेळताना 64.22च्या सरासरीने 578 धावा केल्या आहे. त्याच्या नावावर 3 शतकेही आहेत. याव्यतिरिक्त त्याने 5 विकेट्सही घेतल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने नाबाद 201 धावांची झंझावाती द्विशतकी खेळी केली होती. ही खेळी संपूर्ण जग नेहमी स्मरणात ठेवेल. स्पर्धेत त्याने बॅट आणि चेंडूतून कमाल दाखवली. त्याने 8 सामन्यात 66.33च्या सरासरीने 398 धावा केल्या आहेत. तसेच, 5 विकेट्सही घेतल्या आहेत.

रोहित शर्मा
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 10 सामन्यात फलंदाजी कताना त्याच्या बॅटमधून 55च्या सरासरीने 550 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

जसप्रीत बुमराह
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय गोलंदाजी फळीचे नेतृत्व करत असलेल्या जसप्रीत बुमराह यानेही आपली छाप सोडली आहे. त्याने 10 सामन्यात गोलंदाजी करताना 3.98च्या इकॉनॉमी रेटने 330 धावा खर्चून 18 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

डॅरिल मिचेल
न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) यानेही विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या फलंदाजीने कमाल केली आहे. त्याने भारताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडसाठी तो रचिननंतर सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा राहिला आहे. त्याने 10 सामन्यात 69च्या सरासरीने 552 धावा केल्या आहेत. (icc virat kohli to quinton de kock these cricketers in the race of player of the tournament award odi world cup 2023)

हेही वाचा-
IND vs AUS Final: ना विराट, ना रोहित; पॅट कमिन्सने ‘या’ भारतीयाला म्हटले ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धोका
CWC23 Final Toss: ‘रोहित असाच टॉस कर…’, पाकिस्तानला ट्रोल करत दिग्गजाने सांगितली मजेदार पद्धत, पोट धरून हसाल

Adam Zampa Ahmedabad Final INDvAUS Daryl Mitchell Final free live match ICC World Cup ICC World Cup 2023 ICC world cup Australia vs India ICC world cup final ICC world cup india vs Australia ICC world cup Modi ICC world cup Team India India vs Australia final Indian Cricket Team live match MAN OF THE MATCH Man of the Series Modi Stadium Mohammed Shami Narendra Modi Stadium ODI WORLD CUP player of the tournament Quinton De Kock rachin Ravindra Richard Kettleborough Richard Kettleborough Umpire Richard Kettleborough Umpire in India Vs Australia Final rohit sharma Umpire Richard Kettleborough virat kohli Warner who will win World Cup Final world cup final live अहमदाबाद अहमदाबाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आयसीसी वर्ल्डकप आयसीसी विश्वचषक इंडिया विरुद्ध ॲास्ट्रेलिया ऍडम झम्पा किती रन झालेत? कोण जिंकणार क्विंटन डी कॉक गुजरात टीम इंडिया टीम ॲास्ट्रेलिया डॅरिल मिचेल नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात पंच रिचर्ड केटलबोरो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट फायनल फायनल लाईव्ह भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध ॲास्ट्रेलिया भारतीय क्रिकेट संघ मॅच विनर मॅन ॲाफ द मॅच मोहम्मद शमी रचिन रवींद्र रिचर्ड केटलबोरो रिचर्ड केटलबोरो पंच रिचर्ड केटलबोरो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पंच रोहित शर्मा वनडे विश्वचषक वर्ल्डकप फायनल विराट कोहली विश्वचषक फायनल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---