---Advertisement---

IND vs Aus Final: नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम किती धावा करू शकते डिफेंड? स्वत: पीच क्यूरेटरनेच सांगितला आकडा

Team-India
---Advertisement---

India vs Australia World Cup 2023 Final Pitch: जगभरातील क्रिकेटप्रेमी येत्या रविवारची वाट खूपच दिवसांपासून पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी कदाचित कुठल्याच रविवारची वाट एवढी पाहिली नसावी. मात्र, हा रविवार खूपच खास आहे. कारण, या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी राज्य संघाच्या पीच क्यूरेटरने सांगितले आहे की, जर सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर झाला, तर यावर किती धावांचा बचाव केला जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम (India vs Australia Final) सामन्यापूर्वी राज्य संघाच्या पीच क्यूरेटर (Pitch Curator) म्हणाला की, जर सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर झाला, तर यावर 315 धावांचा बचाव केला जाऊ शकतो. कारण, या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे नसेल. अशात दोन्ही संघांची नजर प्रथम फलंदाजी करत या धावसंख्येच्या जवळ पोहोचण्यावर असेल. मात्र, विश्वचषकादरम्यान हे मैदान आव्हानाचा पाठलाग करण्याच्या बाबतीत यशस्वी राहिला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल पीच रिपोर्ट
शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) बीसीसीआयच्या 2 वरिष्ठ पीच क्यूरेटर आशिष भौमिक आणि तपोश चटर्जी यांच्यासह भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि बीसीसीआयचे देशांतर्गत क्रिकेटचे व्यवस्थापक एबी कुरुविला यांनी अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टीच्या तयारीचे निरीक्षण केले. खेळपट्टीवर वजनदार रोलरचा वापर केला. मात्र, ही पुष्टी केली जाऊ शकत नाही की, अंतिम सामन्यात नवीन खेळपट्टीचा वापर होईल की, वापरलेल्याच खेळपट्टीवर सामना खेळला जाईल.

राज्य संघाच्या एका क्यूरेटरने सांगितले की, “जर वजनदार रोलर काळ्या मातीच्या खेळपट्टीवर वापरला गेला, तर संथ फलंदाजी खेळपट्टी बनवली जात असेल. यावर मोठी धावसंख्या बनवली जाऊ शकते, पण सलग हिट करू शकत नाहीत. 315 धावसंख्येचा बचाव केला जाऊ शकतो. कारण, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे कठीण असेल.”

कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नेहमीप्रमाणे खेळपट्टी पाहण्यात बराच वेळ घालवला आणि दोन्ही क्यूरेटरशीही संवाद साधला.

कसे आहे नरेंद्र मोदी स्टेडिअमची आकडेवारी?
नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) आतापर्यंत 30 सामन्यांचा साक्षीदार बनला आहे. यावर पहिल्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांच्या विजयाची आकडेवारी एकसारखी आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 15 सामने जिंकले आहेत, तर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघालाही 15 वेळाच विजय मिळवण्यात यश आले आहे. मात्र, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेदरम्यानचा नजारा काही वेगळाच आहे. इथे आतापर्यंत विश्वचषकातील 4 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये 3 सामने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या मैदानावर विश्वचषकात आतापर्यंत 300 धावांचा आकडा पार झाला नाहीये. भारताने अहमदाबादमध्ये एकमेव सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. (india vs australia final pitch report records and highest scores in odis at narendra modi stadium ahmedabad icc world cup 2023 final ind vs nz match read here)

हेही वाचा-
वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, मुंबईकर खेळाडू सांभाळणार नेतृत्त्वाची धुरा
पाकिस्तानी फलंदाज मोडणार विराटचा मोठा विक्रम, माजी क्रिकेटपटूच्या विधानाने व्हाल आश्चर्यचकित

Ahmedabad Final INDvAUS Final free live match ICC World Cup ICC World Cup 2023 ICC world cup Australia vs India ICC world cup final ICC world cup india vs Australia ICC world cup Modi ICC world cup Team India India vs Australia final India vs Australia Final Pitch Report Indian Cricket Team INDvAUS World Cup 2023 Final Pitch live match MAN OF THE MATCH Man of the Series Modi Stadium Mohammed Shami Narendra Modi Stadium Pitch pitch curator rohit sharma virat kohli Warner who will win World Cup Final world cup final live अहमदाबाद अहमदाबाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आयसीसी वर्ल्डकप आयसीसी विश्वचषक इंडिया विरुद्ध ॲास्ट्रेलिया किती रन झालेत? कोण जिंकणार खेळपट्टी गुजरात टीम इंडिया टीम ॲास्ट्रेलिया नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात पीच क्यूरेटर फायनल फायनल लाईव्ह भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध ॲास्ट्रेलिया भारतीय क्रिकेट संघ मॅच विनर मॅन ॲाफ द मॅच मोहम्मद शमी रोहित शर्मा वर्ल्डकप फायनल विराट कोहली विश्वचषक फायनल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---