भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआयच्या आयोजनात यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात चांगल्या पद्धतीने पार पडला. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अंहमदाबादमध्ये आयोजित केला जाणार आहे. या सामन्याआधी स्टेडियमच्या वरून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एयर शोसाठी सराव केला.
भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये आयोजित केला गेला आहे. जगातिल सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना आयोजित केला जाणार आहे. या सामन्याआधी बीसीसीआय आणि भारतीय हवाई दलाने एकत्रीत येऊन एयर शो आयोजित केला आहे. यासाठी शुक्रवार (17 नोव्हेंबर) हवाई दलाने या एयर शोसाठी सराव केला. यावेळी स्टेडियममध्ये भारताचे राष्ट्रगीत सुरू होते. सरावादरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Air show with National Anthem of India preparation at Narendra Modi Stadium. ????????
– This is beautiful. [ICC] pic.twitter.com/08fhHf8IGq
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023
दरम्यान, अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने अहमदाबादमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्मा हवाई दलाच्या सरावाकडे पाहातानाच फोटो समोर येत आहे.
Captain Rohit Sharma at Narendra Modi Stadium ahead of the final.
– Time to take over the legacy. ???? pic.twitter.com/mz1zUn7RYE
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023
दरम्यान, भारताचे विश्वचषक स्पर्धेतील प्रदर्शन पाहिले, तर यावर्षी संघ सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात स्पर्धेतील सुरुवातच्या 9 पैकी 9 सामने भारताने जिंकले आणि अंतिम सामन्यात धडक दिली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषकाची सुरुवात अपेक्षित झाली नव्हती. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यानंतर मागच्या सात सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने सलग विजय मिळवले आहेत. अंतिम सामन्यात यजमान भारताला ऑस्ट्रेलियाकडून कडवे आव्हान मिळू शकते. (Airshow with RashtraGeeta at Narendra Modi Stadium, Rohit was also present )
महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023: Finalपूर्वी मोहम्मद शमीवर बंदी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्याच
CWC 23 Final: क्या बात! अतिशय थाटामाटात झाले अहमदाबादमध्ये टीम इंडियाचे स्वागत, पाहा व्हिडिओ