---Advertisement---

CWC 23 Final: क्या बात! अतिशय थाटामाटात झाले अहमदाबादमध्ये टीम इंडियाचे स्वागत, पाहा व्हिडिओ

Rohit-Sharma
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेटप्रेमी 19 नोव्हेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक 2023 अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे विश्वचषकाच्या 13व्या हंगामाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाचा 70 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. आता चाहते अहमदाबादेत पोहोचताच हॉटेलबाहेर चाहत्यांची तुडुंब गर्दी झालील.

भारतीय संघ (Team India) अहमदाबाद (Ahmedabad) येथे पोहोचण्याचा (Team India Reached Ahmedabad) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत चाहत्यांची गर्दी दिसत आहे आणि एकीकडून संघाची बस येताना दिसत आहे. संघाची बस पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पाहायला मिळाली. व्हिडिओत चाहत्यांची प्रतीक्षा स्पष्टपणे दिसत होती. आता हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

चाहते 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या हातात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची ट्रॉफी पाहण्यासाठी आतुर आहेत. भारतीय संघाने अखेरचा वनडे विश्वचषक 2011 साली महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. आता चाहत्यांना भारतीय संघाला तिसऱ्यांदा विश्ववचषक स्पर्धेचा विजेता बनताना पाहायचे आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1725225516226265265

भारतीय क्रिकेट संघाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले आहे. आव्हानात्मक साखळी फेरीपासून ते उपांत्य सामन्यापर्यंत भारताने उत्कृष्ट प्रदर्शन केले. भारत या स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत साखळी फेरीत 9 आणि 1 उपांत्य सामना मिळून एकूण 10 सामने जिंकले आहेत. आता भारतीय संघ विश्वविजेता बनण्यापासून एक सामना दूर आहे. (world cup 2023 team india reached ahmedabad for the world cup final see video here)

हेही वाचा-
World Cup 2023: Finalपूर्वी मोहम्मद शमीवर बंदी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्याच
Semi Final 2: कांगारूंकडून हारताच आफ्रिकेच्या हेड कोचचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘मला कसलाच फरक पडत नाही…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---