भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना होणार आहे. चाहते या सामन्याच्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विराट कोहली याच्या 50व्या वनडे शतकामुळे उपांत्य सामन्यात भारताने मोठी धावसंख्या केली. प्रत्युत्तारत मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंड संघ सर्वबाद झाला आणि अंतिम सामन्यात भारताची जागा पक्की झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ अंतिम सामन्यात खेळणार, त्याआधी पाकिस्तानमधून एक मोठी प्रतिक्रिया समोर येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला जाईळ. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला आहे. उपांत्य सामन्यात बुधवारी (15 नोव्हेंबर) भारताने न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत केले. याच सामन्यात विराट कोहली याने वनडे कारकिर्दीतील 50वे शतक ठोकत सचिन तेंडुलकराच विक्रम मोडला. वनडे क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक करणारा विराट पहिलाच खेळाडू बनला आहे. भविष्यात देखील त्याचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपी गोष्ट नाहीये. असे असले तरी, पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अकमल याच्या मते बाबर आझम असा फलंदाज आहे, जो विराटच्या 50 षटकांचा विक्रम मोडू शकतो.
बुधवारी विराटने न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक झाले. याच यादीत कामरान अकमल याचेही नाव आहे. कामरानने विराटला 50व्या वनडे शतकासाठी शुभेच्छा दिल्या. तो असेही म्हणाला की, “विराटने केलेल्या 50 वनडे शतकांचा विक्रम बाबर मोडू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम पहिल्या तीन क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांनाच करता येऊ शकतो. हा विक्रम मध्यक्रमात खेळणाऱ्या फलंदाजांना पेलता न येण्यासारखाच आहे.” कामरानच्या मते बाबर पाकिस्तानसाठी परच्या फळीत खेळतो आणि भविष्यात तो 50 वनडे शतकेही करू शकतो.
दरम्यान, बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ वनडे विश्वचषक 2023 मध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. परिणामी त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. बाबरने कर्णधारपद सोडताच क्रिकेट पाकिस्तानने शाहीन आफ्रिदी याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनवले, तर कसोटी संघाचे कर्णधारपद शान मसूद याच्याकडे सोपवले. संघासाठी नवीन संचालक, नवीन प्रशिक्षक आणि नवीन निवड समिती देखील नियुक्ती केली गेली आहे. (According to Kamran Akmal, Babar Azam will break Virat Kohli’s record most ODI century)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान संघ भक्कम बनवण्यासाठी वहाब रियाज झटणार! निवृत्तीनंतर PCBने दिली प्रमुख निवडकर्त्याची जबाबदारी
भारतासाठी ‘अनलकी’ पंच अंतिम सामन्यात मैदानात उतरणार! संघाला बदलावी लागणार परंपरा