आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे वसलेल्या जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. याच मैदानावर 5 ऑक्टोबर रोजी स्पर्धेची सुरुवात झाली होती. गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ या सामन्यात आमने-सामने होते. स्पर्धेचा शेवटही याच मैदानावर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सामन्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. आता या सामन्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अशातच आयसीसीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम (India vs Australia Final) सामन्यासाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये रिचर्ड केटलबोरो (Richard Kettleborough) यांच्या नावाचाही समावेश आहे. केटलबोरो यांचे नाव समोर येताच भारतीय क्रिकेटप्रेमी निराश दिसत आहेत. यामागील कारणही खूपच महत्त्वाचे आहे. खरं तर, मागील एक दशकात भारतीय संघ जेव्हाही आयसीसीच्या प्रमुख स्पर्धेत बादफेरीतील सामना खेळण्यास उतरला आहे, त्यात अधिकवेळा केटलबोरो यांनीच मैदानी पंचाची भूमिका साकारली आहे.
त्यांच्या उपस्थितीत प्रत्येक क्षणी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मोठ्या सामन्यात त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. भारतीय चाहते केटलबोरो यांना ‘पनवती अंपायर’ असे म्हणत आहेत.
रिचर्ड केटलबोरो ट्विटर रिऍक्शन्स
रिचर्ड केटलबोरो यांच्याविषयी ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात एका युजरने म्हटले की, “रिचर्ड केटलबोरोंना अहमदाबादमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून नेमले आहे. भारताला शुभेच्छा.”
https://twitter.com/DaCricketGuy/status/1725514937311670436?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725514937311670436%7Ctwgr%5Eb69a4937dfa729e966aed8574b0e7ddef9959afb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-indian-fans-started-getting-scared-due-richard-kettleborough-declared-umpire-world-cup-final-gave-fierce-reactions-twitter
दुसऱ्या एकाने लिहिले की, “मी ऑस्ट्रेलियाला घाबरत नाही. मला रिचर्ड केटलबोरोंची भीती वाटते.”
https://twitter.com/SumerSi52116331/status/1725513231509443035?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725513231509443035%7Ctwgr%5Eb69a4937dfa729e966aed8574b0e7ddef9959afb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-indian-fans-started-getting-scared-due-richard-kettleborough-declared-umpire-world-cup-final-gave-fierce-reactions-twitter
आणखी एक युजर असे म्हणाला की, “आम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रिचर्ड केटलबोरो नको होते. ते बादफेरीत आपल्या संघासाठी सर्वात पनवती आहेत.”
https://twitter.com/ICC/status/1725507819410002081?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725512272444010841%7Ctwgr%5Eb69a4937dfa729e966aed8574b0e7ddef9959afb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-indian-fans-started-getting-scared-due-richard-kettleborough-declared-umpire-world-cup-final-gave-fierce-reactions-twitter
एकाने तर असेही म्हटले की, “रिचर्ड केटलबोरो अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच असतील. हेच तर नको होते.”
https://twitter.com/AbhinayGarg15/status/1725512148460433450?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725512148460433450%7Ctwgr%5Eb69a4937dfa729e966aed8574b0e7ddef9959afb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-indian-fans-started-getting-scared-due-richard-kettleborough-declared-umpire-world-cup-final-gave-fierce-reactions-twitter
एका युजरने म्हटले, “अरे परमेश्वरा, रिचर्ड केटलबोरो पुन्हा आले.”
https://twitter.com/full_starship/status/1725511470556029198?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725511470556029198%7Ctwgr%5Eb69a4937dfa729e966aed8574b0e7ddef9959afb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-indian-fans-started-getting-scared-due-richard-kettleborough-declared-umpire-world-cup-final-gave-fierce-reactions-twitter
खरं तर, रिचर्ड केटलबोरो 2014 टी20 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत, 2015 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात, 2016 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, 2019 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आणि आता 2023 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मैदानी पंचाच्या भूमिकेत आहेत. मागील सर्व वेळी त्यांच्या उपस्थितीत भारताला पराभूत व्हावे लागले होते. आता हा इतिहास भारत बदलतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cwc 23 indian fans started getting scared due richard kettleborough declared umpire world cup 2023 final see twitter reactions)
हेही वाचा-
IND vs Aus Final: नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम किती धावा करू शकते डिफेंड? स्वत: पीच क्यूरेटरनेच सांगितला आकडा
वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, मुंबईकर खेळाडू सांभाळणार नेतृत्त्वाची धुरा