• About Us
  • Privacy Policy
सोमवार, डिसेंबर 11, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार अश्विन! माजी दिग्गजाकडून मिळाले संकेत

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार अश्विन! माजी दिग्गजाकडून मिळाले संकेत

Omkar Janjire by Omkar Janjire
नोव्हेंबर 17, 2023
in ODI World Cup 2023, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Ravichandran Ashwin with Rohit Sharma

Photo Courtesy: Twitter/ICC

भारतीय संघचे वनडे विश्वचषक 2023मध्ये वर्चस्व राहिले आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघात विश्वचषक स्पर्धेत जास्त बदल होताना दिसले नाही. आतापर्यंत 9 पैकी 9 सामने भारताने जिंकले असून अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेचा हा अंतिम सामना आयोजित केला गेला आहे. पण त्याआधी भारताच्या माजी दिग्गजाने संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय संघासाठी या विश्वचषक स्पर्धेत जवळपास प्रत्येक खेळाडू महत्वाचा ठरला आहे. मोहम्मद शमी, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि स्वतः कर्णधार रोहित शर्मा यांच्या खेळीचे कौतुक होत आहे. संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रवळ दावेदार मानला जात होता आणि अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास एकाही अडथळ्याविना त्यांनी पार केला आहे. सर्व खेळाडू चांगल्या लयीत असले तरी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला विसरून चालणार नाही. अश्विनला विश्वचषक स्पर्धेसाठी ऐन वेळी निवडण्यात आले. पण आतापर्यंत झालेल्या 9 पैकी फक्त एका सामन्यात त्याला संधी दिली गेली.

असे असले तरी, आगामी सामन्यात संघ व्यवस्थापन अश्विनला संघात घेण्याबाबत एकदा विचार करू शकते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात अश्विन आपल्या फिरकीची जादू दाखवू शकतो. खेलपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यास संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज मदनलाल यांनी खास प्रतिक्रिया दिली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मदनलाल म्हणाले की, “संघातील अश्विनची निवड खेळपट्टीवर अवलंबून असेल. असे असले तरी, मला नाही वाटत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याला विजय मिळवून देणाऱ्या संघात बदल करेल. ऑस्ट्रेलियाला तरबेज शम्सी याची गोलंदाजी खेळताना अडचण येत होती. त्याच पद्धतीने कुलदीपला खेळतानाही त्यांना अडचण येऊ शकते. मला पूर्ण विश्वास आहे की, अहमदाबादमध्ये फलंदाजी करण्यासाठी एक चांगली खेळपट्टी असेल.”

मदन लाल यांनी अश्विनला संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली असली, तरी चर्चेत सहभागी सुनील गावसकरांना तसे वाटत नाही. गावसकरांच्या मते अश्विनला खेळण्याची संधी मिळेल, याची कुठेच शक्यता नाही. असे झाले, तर मोहम्मद सिराज याला बाहेर बसावे लागेल, जे संघाला परवडणारे नाही, असे गावसकरांना वाटते. दरम्यान, अश्विनने विश्वचषक हंगामात खेळलेला एक सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात अश्विनने 10 षटकात 34 धावा खर्च करून 1 विकेट घेतली होती. (Ravichandran Ashwin may get a chance in the World Cup final against Australia)

महत्वाच्या बातम्या – 
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीजमध्ये देशभरांतून 140हून अधिक खेळाडू सहभागी
भारतासाठी ‘अनलकी’ पंच अंतिम सामन्यात मैदानात उतरणार! संघाला बदलावी लागणार परंपरा

Previous Post

पाकिस्तान संघ भक्कम बनवण्यासाठी वहाब रियाज झटणार! निवृत्तीनंतर PCBने दिली प्रमुख निवडकर्त्याची जबाबदारी

Next Post

पाकिस्तानी फलंदाज मोडणार विराटचा मोठा विक्रम, माजी क्रिकेटपटूच्या विधानाने व्हाल आश्चर्यचकित

Next Post
Sachin Virat Harbhagan

पाकिस्तानी फलंदाज मोडणार विराटचा मोठा विक्रम, माजी क्रिकेटपटूच्या विधानाने व्हाल आश्चर्यचकित

टाॅप बातम्या

  • युवराज सिंगने टीम इंडियाचा कर्णधार न बनण्याचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘सचिन आणि ग्रेग चॅपलमुळे…’
  • पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजाचा क्रिकेटला अलविदा; सहकाऱ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन दिला निरोप, पहा व्हिडिओ
  • RCBने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड? ज्या खेळाडूला काढलं बाहेर, त्याने शतक ठोकून दिले सडेतोड उत्तर
  • मिचेल मार्श घेणार डेव्हिड वॉर्नरची जागा? ‘या’ खेळाडूला आदर्श मानत म्हणाला, ‘एक माणूस जो…’
  • मधला स्टम्प उडला, पण बेल्सने सोडली नाही जागा! मैदानी पंचही पडले गोंधळात, तुम्हीच सांगा Out की Not-Out
  • कांगारूच्या खेळाडूची मोठी मजल! सहकारी अन् भारतीय दिग्गजाला पछाडत ICCचा खास पुरस्कार केला नावे
  • ‘जाड’ असला तरीही रोहित फिटच, भारतीय फिटनेस कोचचे विधान जिंकेल तुमचेही मन; विराटशी केलीय तुलना
  • PKL 10: अर्रर्र! कॅप्टन नवीन कुमारचे दमदार प्रदर्शन ठरले व्यर्थ, दबंग दिल्लीचा हरियाणाकडून 2 गुणांनी पराभव
  • PKL 2023: कर्णधार मनिंदरच्या सुपर 10मुळे बंगालचा थलायवाजवर रोमांचक विजय, गुणतालिकेत मिळवला ‘हा’ नंबर
  • पाकिस्तानची इज्जत चव्हाट्यावर! सीनियर टीम डॉक्टराशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, तर ज्युनियर टीम मॅनेजरशिवाय यूएईत
  • ‘मी कधीच ते पिण्याचा प्रयत्न केला नाही…’, गौतम गंभीरचा ‘त्या’ गोष्टीविषयी मोठा खुलासा
  • WPL 2024: लिलावातील 1 कोटी 30 लाख रुपयांतून आई-वडिलांसाठी ‘ही’ गोष्ट करणार Vrinda Dinesh, वाचून अभिमानच वाटेल
  • पाटलांच्या लेकीने आणले इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ, पदार्पणाच्या मालिकेत POTM पुरस्कार जिंकताच म्हणाली…
  • ‘BCCI इतके पैसे नाहीयेत, पण तुम्ही…’, पावसामुळे सामना रद्द होताच गावसकरांच्या तळपायाची आग मस्तकात
  • IND vs SA: पहिला टी20 सामना टॉसशिवाय रद्द, पाऊस बनला व्हिलन
  • तिसऱ्या टी-20त भारताचा पाच विकेट्स राखून विजय! सलामीला आलेल्या स्मृती मंधानाची सर्वात मोठे खेळी
  • INDvsENG । युवा खेळाडूंच्या फिरकीत अडकला इंग्लंड संघ! अवघ्या 126 धावांवर गुंडाळला डाव
  • खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत बॉम्बे जिमखाना संघाला विजेतेपद
  • पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीग 2023मध्ये जीएम टायफुन्स, रॉयल स्टॅलियन्स संघांचा दुसरा विजय
  • डेव्हिड वॉर्नरचं मिचेल जॉन्सनला चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझ्या आई-वडिलांनी माझे…’
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In