वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यात समोरासमोर येणार आहेत. या अंतिम सामन्यात भारतीय संघ विजेता व्हावा यासाठी सर्व भारतीय चाहते प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला देखील भारत विश्वविजेता व्हावा यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
येळकोट येळकोट जय मल्हार 💛
भारतीय संघाच्या विश्वचषक विजयासाठी खंडेरायाला साकडे #ODIWorldCup2023 #INDvsAUSfinal pic.twitter.com/aetChoVzH9— Mahesh Waghmare 🇮🇳 (@MaheshMGW23) November 18, 2023
भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा अशी तमाम भारतीय चाहत्यांचे अपेक्षा आहे. त्यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी भारतीय संघाच्या विजयासाठी यज्ञ, महायज्ञ केले जात आहेत. वाराणसी व उज्जैन येथे शिवशंकराला अभिषेक देखील घालण्यात आला आहे. असे असतानाच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरामध्ये देखील भारताच्या विजयासाठी साकडे घातले गेलेत.
जेजुरी मंदिरातील सर्व पुजाऱ्यांनी तसेच मानकऱ्यांनी शनिवारी भारतीय संघाच्या विजयासाठी साकडे घालत भंडारा उधळला.
भारतीय संघ बारा वर्षानंतर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळेल. तर ऑस्ट्रेलिया संघ आठ वर्षानंतर अंतिम सामन्यात दिसणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरी व उपांत्य सामना असे सलग दहा सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवानंतर सलग आठ विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केलाय.
अंतिम सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह.
अंतिम सामन्यासाठी संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ: ट्रेविस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), जोस हेजलवूड, मिचेल स्टार्क व ऍडम झम्पा
(Jejuri Khandoba Pujari Doing Prays For Team India Win In ODI World Cup Final)
हेही वाचा-
‘भारताने पहिली बॅटिंग केली, तर संपलं सगळं…’, CWC 2023 Finalच्या एक दिवसाआधी दिग्गजाची भविष्यवाणी
WHOOP: सचिनचा विक्रम मोडताना विराटच्या मनगटावर होते ‘हे’ खास फिटनेस बँड, फीचर्स पाहून चकितच व्हाल