भारतीय संघाचे 12 वर्षांनंतर वनडे विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न तुटले. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासह ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वचषकाचा किताब जिंकण्यात यशस्वी झाला. या पराभवानंतर पुरस्कार सोहळ्यावेळचा रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते भावूक झाले आहेत.
सामन्यानंतर संपूर्ण भारतीय संघ (Team India) निराश झाला. यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) निराश होऊन चालताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांचे डोके खाली झुकल्याचे दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकरीही व्यक्त होत आहेत. एका क्रिकेटप्रेमीने लिहिले की, “रोहित तुझे रडणे वाईट वाटले, पण तू सर्वोत्तम आहेस. तुझ्यासारखा नि:स्वार्थ खेळाडू कुणीच नाही. अद्भूत आहेस तू. तुला असेच खतरनाक सलामीवीर म्हटले जात नाही.”
https://twitter.com/rajat9565/status/1726311509113065885?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726311509113065885%7Ctwgr%5E36d5f2da321df77d7d98e4ffc73a3dffb18278ac%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fpainful-walk-by-rohit-sharma-his-team-after-the-loss-india-vs-australia-final-odi-world-cup-2023%2F449159%2F
दुसऱ्या एकाने ट्वीट करत लिहिले की, “मनापासून वाईट वाटतं यार…जेव्हा पूर्ण प्रयत्न करूनही अपयशी ठरतो.”
https://twitter.com/MyWishIsUs/status/1726316991261397147?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726316991261397147%7Ctwgr%5E36d5f2da321df77d7d98e4ffc73a3dffb18278ac%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fpainful-walk-by-rohit-sharma-his-team-after-the-loss-india-vs-australia-final-odi-world-cup-2023%2F449159%2F
आणखी एकाने लिहिले की, “मनापासून वाईट वाटतं यार, तेही खूप जास्त.”
https://twitter.com/Chiragtalwar23/status/1726316084578689532?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726316084578689532%7Ctwgr%5E36d5f2da321df77d7d98e4ffc73a3dffb18278ac%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fpainful-walk-by-rohit-sharma-his-team-after-the-loss-india-vs-australia-final-odi-world-cup-2023%2F449159%2F
अंतिम सामन्यात भारताचा दारुण पराभव
रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने होते. या थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला फक्त 240 धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत 241 धावा केल्या आणि सामना 6 विकेट्सने खिशात घातला. त्यांच्याकडून ट्रेविस हेड याने सर्वाधिक 137 धावांची शतकी खेळी केली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (painful walk by skipper rohit sharma his team after the loss india vs australia final odi world cup 2023)
हेही वाचा-
ICC स्पर्धेत कोहलीचे चालणे भारतासाठी धोकादायक! आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘विराट तू अजिबात रन करू नको’
सचिन नाही, तर कुणाला माहिती WC Final हारण्याचं दु:ख! पराभवानंतर भारतीय खेळाडूंना दिला दिलासा; फोटो करेल भावूक