सलग 10 सामने जिंकत भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 6व्यांदा विश्वचषक किताब जिंकला. या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले, पण अंतिम सामन्यात भारताच्या हाती निराशा लागली. या सामन्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला. सामन्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे.
काय म्हणाला रोहित?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सामन्यानंतर मोठे विधान केले. तो म्हणाला, “निर्णय आमच्या बाजूने गेला नाही. आम्ही आज चांगली कामगिरी करू शकलो नाहीत. आम्ही सर्वकाही प्रयत्न केले, पण आम्ही यश मिळवू शकलो नाहीत. आणखी 20-30 धावा असत्या, तर चांगले झाले असते. केएल राहुल आणि विराट कोहलीने चांगली भागीदारी केली आहे. आम्ही 270 आणि 280 धावांकडे पाहत होतो, पण विकेट्स लवकर पडत गेल्या.”
का झाला पराभव?
भारतीय कर्णधाराने पुढे बोलताना म्हटले की, “जेव्हा तुम्ही 240 धावा बनवता, तेव्हा तुम्हाला विकेटची गरज असते. मात्र, हेड आणि लॅब्युशेन यांना खेळ पुढे नेण्यासाठी श्रेय दिले पाहिजे. मात्र, मला वाटते की, सायंकाळचा वेळ फलंदाजीसाठी चांगला होता. मात्र, मी यावर कोणतीही स्पष्टीकरण देत नाहीये. आम्ही धावा करू शकलो नाहीत आणि हेड आणि लॅब्युशेनच्या भागीदारीला श्रेय दिले पाहिजे.”
सामन्याची स्थिती
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 10 विकेट्स गमावत 240 धावाच केल्या. भारताकडून विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांनी अर्धशतक केले. कर्णधार रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला.
भारताचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 241 धावा करून पार केले. यावेळी त्यांच्याकडून ट्रेविस हेडने 120 चेंडूत सर्वाधिक 137 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 4 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता. तसेच, मार्नस लॅब्युशेन यानेही नाबाद 58 धावांची खेळी केली. त्यांच्यात 192 धावांची भागीदारी झाली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला 6व्यांदा विश्वविजेता बनवले. (ind vs aus final loss captain rohit sharma first reaction tells reasons of loosing world cup 2023 know here)
हेही वाचा-
Mohammed Shami Mother: इकडे देशासाठी खेळत होता शमी, तिकडे आईला करावे लागले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट
पराभव स्वीकारणं रोहितला नाही जमलं, ट्रॉफी हातून निसटल्यावर धाय मोकलून रडला