ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

ICC स्पर्धेत कोहलीचे चालणे भारतासाठी धोकादायक! आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘विराट तू अजिबात रन करू नको’

विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ अंतिम सामन्यात जाऊन ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभूत झाला. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली. असे असले, तरीही भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. अशात विराट कोहली आयसीसी स्पर्धा गाजवत आला आहे, पण त्याने यादरम्यान सर्वाधिक धावा करणे चांगले राहिले नाही. असे आम्ही नाही, तर आकडेवारी सांगते. आयसीसी स्पर्धेत विराटने जेव्हाही सर्वाधिक धावा केल्या आहेत, तेव्हा बादफेरीत भारतीय संघाच्या हाती निराशा लागली आहे.

विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक धावा
विराट कोहली (Virat Kohli) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत 11 सामने खेळताना 95.62च्या सरासरीने सर्वाधिक 765 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 6 अर्धशतके निघाली आहेत. 48 वर्षांच्या इतिहासात विराट कोहली विश्वचषक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. विराट कोहली विश्वचषक 2023 (Virat Kohli World Cup 2023) स्पर्धेसाठी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराचाही मानकरी ठरला. यापूर्वीही असे झाले आहे की, विराट कोहली आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (Virat Kohli High Scorer In ICC Tournaments) बनला आहे आणि संघाला बादफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विराट विश्वचषक 2022 टी20 विश्वचषक
यापूर्वी विश्वचषक 2022 स्पर्धेत टी20 विश्वचषक स्पर्धेतही विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला होता. त्याने 6 सामन्यातील 6 डावात 296 धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभूत झाला होता.

विराटने 2016चा टी20 विश्वचषकही गाजवला
त्यापूर्वी 2016मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकातही विराट कोहली स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याने 5 सामन्यातील 5 डावात 136.50च्या सरासरीने 273 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत भारत उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 7 विकेट्सने पराभूत झाला होता.

विश्वचषक 2014 मध्येही विराटच टॉपर
तसेच, 2014च्या टी20 विश्वचषकातही विराट कोहली स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 6 सामन्यातील 6 डावात 103.33च्या सरासरीने 319 धावा केल्या होत्या. त्यात 4 अर्धशतकांचा समावेश होता. मात्र, त्यावेळी भारतीय संघाला अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. (cricketer virat kohli icc tournaments high scorer is not good for indian team lets know interesting records world cup 2023 final)

हेही वाचा-
सचिन नाही, तर कुणाला माहिती WC Final हारण्याचं दु:ख! पराभवानंतर भारतीय खेळाडूंना दिला दिलासा; फोटो करेल भावूक
मोठी बातमी! टीम इंडियासोबत संपला द्रविडचा प्रवास, फायनलमधील पराभवानंतर सोडणार मुख्य प्रशिक्षकपद?

Related Articles