कुठलाच भारतीय क्रिकेटप्रेमी 19 डिसेंबरचा दिवस कधीच लक्षात ठेवू इच्छिणार नाही. कारण, याच दिवशी विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. 2011च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाचे आयसीसी वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले. या पराभवानंतर भारतीय खेळाडू खूपच दु:खी झाले. यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतीय खेळाडूंना दिलासा देताना दिसला.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम 1 लाख 32 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी गच्च भरलं होतं. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 10 विकेट्स गमावत 240 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेड याच्या 137 धावांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर 43 षटकातच 4 विकेट्स गमावत 241 धावा केल्या. तसेच, सामना 6 विकेट्सने जिंकला.
सामना संपल्यानंतर विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि स्वत: कर्णधार रोहित शर्मादेखील आपले अश्रू रोखू शकणार नाही. प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) भारतीय संघाच्या खेळाडूंना भेटला. यावेळी त्याने त्यांच्याशी संवाद साधत त्यांना दिलासा देताना दिसला. सचिनला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर किती वाईट वाटते, याचा अनुभव आहे. 2003च्या विश्वचषक अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
After the match, Rohit Sharma had a deep conversation with Sachin Tendulkar. pic.twitter.com/HOQdSOS6Qk
— Vishal. (@SPORTYVISHAL) November 19, 2023
Sachin knows the pain of losing the final, its sad scenes. pic.twitter.com/yl17XJqOMt
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
Sachin speaks with Virat after the loss in the final!#ViratKohli𓃵 #INDvsAUSfinal pic.twitter.com/xU1GDsEoNo
— Virat Kohli Fan Club (@TeamVirat) November 20, 2023
विराट कोहली प्लेयर ऑफ द टूर्नामेंट
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याचे प्रदर्शन संपूर्ण स्पर्धेदरम्यान शानदार राहिले. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. त्यासाठी त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आले. 35 वर्षीय विराट कोहली विश्वचषक 2023 स्पर्धेत 11 सामने खेळला. यामध्ये त्याने 95.62च्या शानदार सरासरीने 765 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतकेही केली.
स्पर्धेत विराटने अनेक विक्रम मोडले. त्यातील सर्वात महत्त्वाचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या वनडेतील 49 शतकांची बरोबरी करण्याचा होता. तसेच, उपांत्य सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतक करत वनडे शतकांचा आकडा 50 केला. त्यामुळे विराट आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. (master blaster sachin tendulkar consoling indian players after losing final world cup 2023)
हेही वाचा-
मोठी बातमी! टीम इंडियासोबत संपला द्रविडचा प्रवास, फायनलमधील पराभवानंतर सोडणार मुख्य प्रशिक्षकपद?
CWC2023Final । पराभवानंतरही विराटच ठरला मालिकावीर! जाणून घ्या संपूर्ण हंगामातील प्रदर्शन