रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारतीय संघाचे 12 वर्षांपासूनचे स्वप्न तुटले. भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारताच्या पराभवाविषयी जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कुणी भारतीय संघाचे स्पर्धेतील चांगल्या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले, तर कुणी अंतिम सामन्यातील खराब कामगिरीवर बोट ठेवले. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी यशस्वी कर्णधार रिकी पाँटिंग यानेही बीसीसीआयविषयी खळबळजनक विधान केले. त्याच्या विधानाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
रिकी पाँटिंगचे भारताविषयी खळबळजनक विधान
भारतीय संघाच्या पराभवानंतर एक ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात असे सांगितले गेले आहे की, ऑस्ट्रेलियन माध्यमांशी बोलताना रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने बीसीसीआय बोर्डाच्या पैसा आणि शक्तीवर बोट ठेवत खिल्ली उडवली. तो म्हणाला, “हा क्रिकेट माफियांविरुद्ध न्यायाचा विजय आहे. तुमचा (बीसीसीआय) पैसा आणि शक्ती तुमच्यासाठी अजूनही विश्वचषक जिंकत नाहीये. हे किती लाजीरवाणे आहे.” आता पाँटिंगचे हे विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे.
https://twitter.com/ahadfoooty/status/1726266942414348397
https://twitter.com/AAPforNewIndia/status/1726358125564014813
भारताचा पराभव
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 10 विकेट्स गमावत 240 धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांनीच अर्धशतक केले होते. तसेच, ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना यावेळी मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या होत्या.
भारताच्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच 4 विकेट्स गमावत 241 धावा केल्या. तसेच, 7 षटके आणि 6 विकेट्स राखून सामना नावावर केला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड चमकला. त्याने टिच्चून फलंदाजी करत 120 चेंडूत 137 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 4 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता. तसेच, मार्नस लॅब्युशेन यानेही नाबाद 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. (Ricky Ponting sensational statement about team india after australia won world cup 2023 final)
हेही वाचा-
CWC 2023 । भारताच्या पराभवानंतर ढसाढसा रडला मोहम्मद सिराज! अनुष्कामुळे सावरला विराट
धक्कादायक! दारुण पराभवासाठी गावसकरांनी ‘या’ दोघांना धरलं जबाबदार; सांगूनच टाकलं, नेमकी कुठं झाली चूक