वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1,30,000 भारतीय चाहत्यांना ऑस्ट्रेलियन संघाने शांत केले, जसे त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स यांने सामन्यापूर्वी म्हटले होते. पण भारतीय संघाला विजयाबाबत पूर्ण आत्मविश्वास होता. प्रत्यक्षात निकाल आपल्या विरोधात गेल्यानंतर मोहम्मद सिराज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
वनडे विश्वचषक 2023 (WC 2023) चा हा अंतिम सामना रविवार (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील ही लढत रोमांचक ठरली. पण ट्रेविस हेड याचे वादळ भारतीय संघ रोखू न शकल्यामुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 240 धावा केल्याहोत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 241 धावांचे लक्ष्य 43 षटकांमध्ये आणि चार विकेट्सच्या नुकसानावर गाठले. 120 चेंडूत 137 धावांची खेळी करणारा ट्रेविस हेड याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.
भारतीय संघ () एकही पराभव न स्वीकारता स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. अंतिम सामन्यात देखील ऑस्ट्रेलियापेक्षा भारताचे पारडे जड मानले जात होते. असे असले तरी, आधी फलंदाज आणि नंतर गोलंदाजी विभाग अपेक्षित प्रदर्शन न करू शकल्यामुळे भारतला तिसरा वनडे विश्वचषक जिंतला आला नाही. पराभवानंतर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामथ्ये वेगवान गोलंदाजाला अश्रू अनावर झाले आहेत. जसप्रीत बुमराह त्याला सावरतानाही या व्हिडिओत दिसत आहे.
#MohammedSiraj
Proud of you all boys don’t cry
Loss win part of game pic.twitter.com/VyYRgNLoNa— d r cheeta (@drcheeta172168) November 19, 2023
विराट कोहली याच्यासाठी हा शेवटचा वनडे विश्चषक ठरू शकतो. पण संघ विराट आणि रोहितसाठी हा विश्वचषक जिंकू शकला नाही. पराभवानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्काचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोत अनुष्काने विराटाचे सांत्वन करण्यासाठी गळाभेट घेतली आहे.
Anushka Sharma hugging Virat Kohli after the loss in the final. [Sportstar]
– This is painful. pic.twitter.com/dUYo7oAZAF
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
दरम्यान, पराभवानंतर स्वतः कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक केएल राहुल हे दोघेही भावूक झाले होते. भारतीय संघाच्या पराभवास खासकरून फलंदाजांनी गमावलेल्या झटपट विकेट्स आणि सुमार क्षेत्ररक्षण या दोन बाबी कारणीभूत ठरल्या. कर्णधार रोहित मोठी खेळी करू शकत असताना चुकीचा शॉट खेळून त्याने वैयक्तिक 47 धावांवर विकेट गमावली. तसेच विराट कोहली 54, तर केएल राहुल 66 धावा करून तंबूत परतले. संघातील इतर एकही फलंदाज 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे योगदान अंतिम सामन्यात देऊ शकला नाही. लक्ष्य मोठे नसल्यामुळे गोलंदाज देखील दबाव बनवू शकले नाहीत. अनेकदा खेळाडूंच्या हातून चेंडू सुटल्यामुळे ऑस्ट्रेलियाला चार धावा मिळाल्याचे दिसले. (IND vs AUS World Cup Final Mohammad Siraj cried after the defeat)
महत्वाच्या बातम्या –
‘रोहित जगातील सर्वात दुर्दैवी माणूस…’, भारताकडून वर्ल्डकप हिसकावताच शतकवीर हेडचे ‘हिटमॅन’विषयी मोठे भाष्य
गावसकरांनी सांगितला IND vs AUS Finalचा टर्निंग पॉईंट; रोहितचं नाव घेत म्हणाले, ‘….गरजच नव्हती’