---Advertisement---

गावसकरांनी सांगितला IND vs AUS Finalचा टर्निंग पॉईंट; रोहितचं नाव घेत म्हणाले, ‘….गरजच नव्हती’

Rohit-Sharma
---Advertisement---

रविवार (दि. 19 नोव्हेंबर) हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरला. भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वचषक विजेता बनला. यावर माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी रोहित शर्मा याच्या विकेटविषयी मोठे विधान केले.

काय म्हणाले गावसकर?
रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर थोड्याच वेळात श्रेयस अय्यर हादेखील 6 धावा करून तंबूत गेला. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 10.2 षटकात 81 धावांवर 3 बाद अशी झाली. याचवेळी भारतीय संघावर दबाव आला. यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खराब शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले.

स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना ते म्हणाले की, “तो शॉट या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो. कारण त्यावेळीपर्यंत रोहित खूपच चांगली फलंदाजी करत होता आणि त्याची खेळण्याची पद्धतही तशी आहे. मात्र, जेव्हा मागील दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार आला, षटकात 10 धावा आल्या आहेत, तेव्हा त्याने तो शॉट खेळायला नको होते. मला माहितीये की, जर तो शॉट षटकार गेला असता, तर आपण सर्वजण त्याचे कौतुक करत असतो, पण सामन्यात नेहमी एक पाचवा गोलंदाज असतो, ज्यावर तुम्ही निशाणा साधता. त्यावेळी तसे करण्याची काहीच घाई नव्हती.”

याव्यतिरिक्त भारतीय फलंदाजांनी 3-4 विकेट्स पडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांच्या षटकातही खूपच निर्धाव चेंडू खेळले. याविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, “मॅक्सवेल, हेड आणि मार्श हे ऑस्ट्रेलियाचे पाचवे गोलंदाज आहेत. त्यांच्या 10 षटकात तुम्ही फटकेबाजी करू शकता, पण त्यांच्या षटकात फलंदाजांनी एकेरी धावही घेतली नाही. जर त्यांच्या षटकात 6-6 धावा जरी आल्या असत्या, तरी संघाची धावसंख्या कमीत कमी 20-30 धावा जास्त असती, पण असे घडले नाही.”

रोहित शर्माची खेळी
या सामन्यात भारताच्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची विजयी खेळी करत ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवले.

भारतीय संघाच्या डावादरम्यान एक वेळ अशी होती, जेव्हा भारताची धावसंख्या 9.3 षटकात 1 बाद 76 धावा होती. तसेच, रोहित शर्मा 30 चेंडूत 47 धावांवर खेळत होता, पण 31व्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रोहितने आपली विकेट गमावली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. (cwc 2023 former cricketer sunil gavaskar reacts rohit sharma wicket said shot turning point game)

हेही वाचा-
CWC23 FINAL: 6व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनताच कमिन्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ…’
IND vs AUS FINAL: पराभवानंतर रोहितने केलं मन मोकळं; पहिली रिऍक्शन देत म्हणाला, ‘चांगली फलंदाजीच केली नाही…’

Ahmedabad Final INDvAUS Final free live match ICC World Cup ICC World Cup 2023 ICC world cup Australia vs India ICC world cup final ICC world cup india vs Australia ICC world cup Modi ICC world cup Team India India vs Australia final Indian Cricket Team live match MAN OF THE MATCH Man of the Series Modi Stadium Mohammed Shami Narendra Modi Stadium Pat Cummins World Cup 2023 Richard Kettleborough Richard Kettleborough Umpire Richard Kettleborough Umpire in India Vs Australia Final rohit sharma Rohit Sharma Record Sunil Gavaskar Sunil Gavaskar Reaction Sunil Gavaskar Statement Umpire Richard Kettleborough virat kohli Virat kohli Record Warner who will win World Cup Final world cup final live अहमदाबाद अहमदाबाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आयसीसी वर्ल्डकप आयसीसी विश्वचषक इंडिया विरुद्ध ॲास्ट्रेलिया किती रन झालेत? कोण जिंकणार गुजरात टीम इंडिया टीम ॲास्ट्रेलिया नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात पंच रिचर्ड केटलबोरो पॅट कमिन्स विश्वचषक 2023 फायनल फायनल लाईव्ह भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध ॲास्ट्रेलिया भारतीय क्रिकेट संघ मॅच विनर मॅन ॲाफ द मॅच मोहम्मद शमी रिचर्ड केटलबोरो रिचर्ड केटलबोरो पंच रिचर्ड केटलबोरो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पंच रोहित शर्मा रोहित शर्मा रेकॉर्ड रोहित शर्माचा विक्रम वर्ल्डकप फायनल विराट कोहली विराट कोहली रेकॉर्ड विराट कोहलीचा विक्रम विश्वचषक फायनल सुनील गावसकर सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया सुनील गावसकर यांचे विधान सुनील गावसकरांची रिऍक्शन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---