ऑस्ट्रेलिया संघाने बादफेरीत त्यांची ताकद काय आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषक किताब आपल्या नावावर केला. विश्वचषकाचा किताब जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ खूपच आनंदी दिसला. तसेच, सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सची प्रतिक्रिया चर्चेत आहे. चला तर, कमिन्स नेमका काय म्हणालाय जाणून घेऊयात…
पॅट कमिन्सचे विधान
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) भलताच खुश झाला. त्याने म्हटले की, “मला वाटते, आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ अखेरच्या सामन्यासाठी राखून ठेवला होता. आम्ही संपूर्ण स्पर्धेत प्रथम फलंदाजी करत राहिलो आणि आम्ही विचार केला की, आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ही चांगली रात्र आहे. वास्तवात चेंडू तितका फिरला नाही, जेवढी आम्हाला अपेक्षा होती. खेळाडूंचे प्रदर्शन शानदार राहिले. आमच्याकडे जास्त वय असलेले खेळाडू आहेत, पण अजूनही प्रत्येकजण स्वत:ला मैदानावर झोकून देत आहे.”
पुढे बोलताना कमिन्स म्हणाला, “आम्ही विचार केला होता की, या खेळपट्टीवर 300 कठीण आहे. परंतु, हे पार केले जाऊ शकत होते. वास्तवात 240मुळे आम्ही उत्साही होतो. शानदार. शांत डोक्याचा मार्नस आणि ट्रेविस तेच करतात, जे ते मोठ्या स्पर्धांमध्ये करतात. त्यांनी चांगला खेळ केला. निवडकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि ही एक मोठी जोखिम आहे, जी आम्ही घेतली आणि याचे फळ मिळाले. मी पूर्ण गोलंदाजी डावादरम्यान खूपच खुश होतो. तुम्ही चारही बाजूला पाहता आणि आज रात्री काहीही झाले असले, तरीही हा एक विशेष क्षण आहे. तुम्हाला जावे लागेल आणि विश्वचषक जिंकावा लागेल. तुम्ही हे घडण्याची वाट पाहू शकत नाहीत. हे वर्ष दीर्घ काळ आठवणीत ठेवले जाईल आणि हिवाळ्यात आम्हाला खूप यश मिळाले, हे सर्व शिखरावर आहे.”
ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वविजेता
विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाला साखळी फेरीतील दोन सामने गमवावा लागले होते. मात्र, यानंतर संघाने सलग 9 सामने जिंकून विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला. खरं तर, विश्वचषक जिंकून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता बनला आहे. सर्वप्रथम संघाने 1987 मध्ये आपला पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर संघाने 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 स्पर्धेचाही किताब जिंकला. (aussie captain pat cummins statement after win the world cup 2023 ind vs aus final)
हेही वाचा-
IND vs AUS FINAL: पराभवानंतर रोहितने केलं मन मोकळं; पहिली रिऍक्शन देत म्हणाला, ‘चांगली फलंदाजीच केली नाही…’
पराभव स्वीकारणं रोहितला नाही जमलं, ट्रॉफी हातून निसटल्यावर धाय मोकलून रडला