---Advertisement---

140 कोटी भारतीयांनो दु:खी होऊ नका! Team Indiaने 12 पैकी ‘एवढे’ पुरस्कार केलेत नावावर, तुम्हालाही वाटेल अभिमान

Virat-Kohli
---Advertisement---

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत एकूण चांगले प्रदर्शन केले. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. एका खराब दिवसाने 140 कोटी चाहत्यांचे किताब जिंकण्याचे स्वप्न मोडले. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या 240 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडच्या शतकाच्या जोरावर सहजरीत्या 241 धावा केल्या आणि 6 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, 6व्यांदा विश्वचषकाचा किताब जिंकला. या पराभवानंतर प्रत्येक जण निराश होता, पण भारतीय खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत लाजवाब प्रदर्शन केले आणि 12पैकी 6 पुरस्कार आपल्या नावावर केले.

भारताने गोल्डन बॅट (Golden Bat) आणि गोल्डन बॉल (Golden Ball) यांच्यासह प्लेयर ऑफ द टूर्नामेंट (Player of the Tournament) पुरस्कारही नावावर केला. या पुरस्कारांवरून समजते की, भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेदरम्यान किती चांगले प्रदर्शन केले आहे. चला तर, या सर्व पुरस्कारांवर एक नजर टाकूयात…

विश्वचषक 2023 पुरस्कार विजेत्यांची यादी-
-प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: विराट कोहली (765 धावा आणि एक विकेट)
-प्लेयर ऑफ द मॅच (अंतिम सामना): ट्रेविस हेड (137 धावा)
-स्पर्धेतील सर्वाधिक धावा (गोल्डन बॅट): विराट कोहली (11 सामन्यात 765 धावा)
-स्पर्धेतील सर्वाधिक शतके: क्विंटन डी कॉक (चार शतके)
-स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या: ग्लेन मॅक्सवेल (अफगानिस्तानविरुद्ध- 201*)
-स्पर्धेतील सर्वाधिक स्ट्राईक रेट: ग्लेन मॅक्सवेल (150.37)
-स्पर्धेतील सर्वाधिक अर्धशतके: विराट कोहली (6 अर्धशतके)
-स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स (गोल्डन बॉल): मोहम्मद शमी (24 विकेट्स)
-स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी: मोहम्मद शमी (न्यूजीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात- 7/57)
-स्पर्धेतील सर्वाधिक षटकार- रोहित शर्मा (31 षटकार)
-स्पर्धेतील सर्वाधिक झेल: डॅरिल मिचेल (11 झेल)
-स्पर्धेतील एका यष्टीरक्षकाने घेतलेल्या विकेट्स: क्विंटन डी कॉक (20 विकेट्स)

भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
भारतीय संघाने 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या अभियानाला सुरुवात केली होती. यानंतर संघाने अफगाणिस्तान, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला. यानंतर भारताने आव्हानाचा बचाव करताना इंग्लंडला 100 धावांनी, श्रीलंकेला 302 धावांनी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 243 धावांनी आणि नेदरलँड्सविरुद्ध 160 धावांनी विजय मिळवत साखळी फेरीतील सर्व 9 सामने जिंकले.

उपांत्य सामन्यात भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान होते. मात्र, या सामन्यात संघाने 397 धावसंख्या उभारली होती. या सामन्यात न्यूझीलंड संघ 48.5 षटकात 327 धावाच करू शकला. त्यामुळे भारताने हा सामना 70 धावांनी आपल्या नावावर केला. भारताने संपूर्ण विश्वचषकात शानदार प्रदर्शन केले, पण अंतिम सामन्यात भारत विजय मिळवण्यात अपयशी ठरला. (World Cup 2023 Award Winners List golden bat to player of the tournament virat kohli rohit sharma read)

हेही वाचा-
CWC2023Final । पराभवानंतरही विराटच ठरला मालिकावीर! जाणून घ्या संपूर्ण हंगामातील प्रदर्शन
‘क्रिकेट माफियांविरुद्ध न्यायाचा विजय, तुमचा पैसा आणि पॉवर…’, पराभवानंतर पाँटिंगने काढली BCCIची ‘लाज’

Ahmedabad Final INDvAUS Daryl Mitchell Final free live match Glenn Maxwell Golden Ball Golden bat ICC World Cup ICC World Cup 2023 ICC world cup Australia vs India ICC world cup final ICC world cup india vs Australia ICC world cup Modi ICC world cup Team India India vs Australia final Indian Cricket Team live match MAN OF THE MATCH Man of the Series Modi Stadium Mohammed Shami Narendra Modi Stadium player of the tournament Quinton De Kock Richard Kettleborough Richard Kettleborough Umpire Richard Kettleborough Umpire in India Vs Australia Final rohit sharma Rohit Sharma Record Travis Head Umpire Richard Kettleborough virat kohli Virat kohli Record Warner who will win World Cup 2023 Award Winners List World Cup Final world cup final live अहमदाबाद अहमदाबाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आयसीसी वर्ल्डकप आयसीसी विश्वचषक इंडिया विरुद्ध ॲास्ट्रेलिया किती रन झालेत? कोण जिंकणार क्विंटन डी कॉक गुजरात गोल्डन बॅट गोल्डन बॉल ग्लेन मॅक्सवेल टीम इंडिया टीम ॲास्ट्रेलिया ट्रेविस हेड डॅरिल मिचेल नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात पंच रिचर्ड केटलबोरो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट फायनल फायनल लाईव्ह भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध ॲास्ट्रेलिया भारतीय क्रिकेट संघ मॅच विनर मॅन ॲाफ द मॅच मोहम्मद शमी रिचर्ड केटलबोरो रिचर्ड केटलबोरो पंच रिचर्ड केटलबोरो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पंच रोहित शर्मा रोहित शर्मा रेकॉर्ड रोहित शर्माचा विक्रम वर्ल्डकप फायनल विराट कोहली विराट कोहली रेकॉर्ड विराट कोहलीचा विक्रम विश्वचषक फायनल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---