ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत क्रिकेटविश्वाला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. त्यामध्ये विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याचाही समावेश होतो. याच वॉर्नरने आता कसोटी क्रिकेटच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. जगभरात सुरू असलेल्या टी20 फ्रँचायझी लीगमध्ये युवा खेळाडूंची वाढती उत्सुकता पाहून त्याला कसोटी क्रिकेट संपण्याची भीती सतावत आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये त्याच्या सिडनी थंडर संघातील एका सहकाऱ्याचे उदाहरण देत भाष्य केले आहे.
काय म्हणाला वॉर्नर?
डेविड वॉर्नर (David Warner) याने कसोटी क्रिकेटच्या भविष्याविषयी भाष्य करत म्हटले की, “मी एकेदिवशी ऑलिव्हर डेविस (सिडनी थंडरचा खेळाडू) याच्यासोबत बोलत होतो. त्याला पांढऱ्या चेंडूने खेळला जाणारा क्रिकेट प्रकार आवडतो. मी त्याला लाल चेंडूने खेळताना कदाचितच पाहू शकेल. जर त्याने त्याचे लक्ष कसोटी क्रिकेटकडे दिले, तर तो निश्चितच लाल चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये दिसू शकतो. मात्र, क्रिकेट ज्या दिशेने पुढे जात आहे, ते पाहता मला भीती वाटते की, पुढील 5-10 वर्षात काय होईल माहिती नाही.”
पुढे बोलताना वॉर्नर म्हणाला की, “मला ते खेळाडू जास्त आवडतात, जे लाल चेंडूने क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येतात. तसेच, कसोटी क्रिकेट खेळतात. कारण, हा वारसा आहे, जो तुम्हाला मागे सोडला पाहिजे.”
‘काही खेळाडू कसोटी न खेळताच…’
ऑस्ट्रेलियातील काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी कसोटी क्रिकेट न खेळताच क्रिकेट जगतात मोठे नाव कमावले आहे. त्यात टीम डेविड, ख्रिस लिन आणि मार्कस स्टॉयनिस यांसारख्या नावांचा समावेश आहे. त्यांनी टी20 क्रिकेटमध्ये लाजवाब खेळ दाखवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, वॉर्नरला वाटते की, हे खेळाडू अपवाद आहेत. तसेच, अधिकतर खेळाडू कसोटी क्रिकेट खेळूनच त्यांचे मूल्य वाढवू शकतात.
वॉर्नर म्हणतो की, “असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी कसोटी क्रिकेट न खेळताच त्यांची ओळख बनवण्यात यशस्वी झाले आहेत. युवा खेळाडू सध्या याच टी20 लीग आणि पैसे पाहत आहेत, तर आपले मूल्य वाढवण्याचा सर्वात चांगला मार्ग आपले नाव बनवणेच आहे.”
वॉर्नरची कारकीर्द
डेविड वॉर्नर याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ऑस्ट्रेलियाकडून 101 कसोटी सामने, 141 वनडे सामने आणि 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 8132 धावा, वनडेत 6007 धावा आणि टी20त 2894 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 45 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. (cricketer david warner on future of test cricket as youth cricketers gives preference to t20 franchise leagues)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाळिशी पार करणारा शोएब मलिक घेणार नाही निवृत्ती; म्हणाला, ‘मी 25 वर्षांच्या खेळाडूपेक्षा जास्त फिट…’
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स