गुरुवारी (दि. 27 एप्रिल) सायंकाळी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम येथे राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023चा 37वा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला 32 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात राजस्थान संघाने शानदार प्रदर्शन करत चार वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई संघाला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 202 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघ 170 धावाच करू शकला. राजस्थानच्या विजयात मोलाचे योगदान देणारा युवा फलंदाज ध्रुव जुरेल एमएस धोनी याच्याबाबत मोठे विधान केल्यामुळे चर्चेत आहे.
ध्रुव जुरेलची वादळी खेळी
राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याने विस्फोटक फलंदाज म्हणून संघात एन्ट्री केली आहे. तसेच तो त्याची भूमिका लीलया पार पाडत आहे. त्याने राजस्थानसाठी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे राजस्थानला विजय मिळवण्यात यश आले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्धही जुरेलने वादळी फटकेबाजी करत 226.67च्या स्ट्राईक रेटने 15 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले होते. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 3 चौकारांचाही समावेश होता. झाले असे की, या सामन्यात ध्रुव जुरेल एमएस धोनी (Dhruv Jurel MS Dhoni) याच्या हातून धावबाद झाला होता, त्यानंतर त्याने दिलेले एक वक्तव्य भलतेच चर्चेत आहे.
‘वीस वर्षांनंतरही लक्षात ठेवेल’
खरं तर, ध्रुव जुरेल याने धोनीकडून धावबाद झाल्यानंतर हे वक्तव्य केले. तो म्हणाला की, “जेव्हा मी 20 वर्षांनंतर स्कोरकार्डवर लक्ष देईल, तेव्हा मी हे पाहील की, एमएस धोनी सरांनी मला धावबाद केले आहे. हे पाहून मला खूप अभिमान वाटेल. स्कोरबोर्डमध्ये त्यांचे नाव माझ्या नावासोबत असेल आणि हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.”
एमएस धोनी सन 2023मध्ये अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणा बनला आहे. सामन्यानंतर नेहमी धोनी युवा खेळाडूंसोबत खेळाबाबत चर्चा करत आहे आणि त्यांना क्रिकेटचे धडेही देत आहे.
राजस्थानचे दमदार पुनरागमन
चेन्नईला आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का देत संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने शानदार पुनरागमन केले आहे. यापूर्वी खेळलेले दोन्ही सामने राजस्थानने गमावले होते. या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर यशस्वी जयसवाल याने 43 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या होत्या. त्याच्यासोबत जोस बटलर यानेही 27 धावांचे योगदान दिले. त्यानंतर ध्रुव जुरेल याने वादळी फलंदाजी करत संघाच्या 200 धावांचा आकडा पार करण्यात मोलाचा वाटा उचलला. चेन्नईला या सामन्यात 32 धावांनी पराभूत केल्यानंतर गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. (cricketer dhruv jurel on ms dhoni said after 20 years i willl feel very proud)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रबाडाने 2 नो-बॉल टाकताच भडकला दिग्गज क्रिकेटर; म्हणाला, ‘अरे तू एक आंतरराष्ट्रीय गोलंदाज…’
‘माझ्या देशाने माझ्यावर…’, KKRच्या उपकारांची आठवण काढत भावूक झाला रसेल