क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका सामन्यादरम्यान छातीत चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मात्र, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
ही घटना दिल्लीतील स्वरूप नगर भागातील एका शाळेतील आहे. शुक्रवारी येथे क्रिकेट खेळत असलेल्या हबीब मंडल नावाच्या ३० वर्षीय तरुणाचा छातीत चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तो क्रिकेट खेळण्यासाठी कोलकाताहून दिल्लीत आला होता. शाळेच्या आवारातच तो क्रिकेट खेळत होता. तेव्हाच त्याच्या छातीत चेंडू लागल्याची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान चेंडू तरुणाच्या छातीवर लागला. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. याबाबत त्यांनी मृत हबीब मंडलच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीबला कोणताही जुनाट आजार होता की नाही हे कुटुंबीय आल्यानंतरच समजेल.
याआधी लांबा आणि ह्यूज असेच मरण पावले आहेत
याआधी भारताचा रमन लांबा आणि ऑस्ट्रेलियाचा फिलिप ह्यूज यांचा जमिनीवर पडून मृत्यू झाला आहे. १९८८मध्ये, रमन लांबा बांगलादेशमध्ये खेळल्या जात असलेल्या ढाका प्रीमियर लीगच्या एका सामन्यात खेळत होते, हा अपघात २० फेब्रुवारी रोजी झाला होता. तो फॉरवर्ड शॉट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू त्याच्या डोक्याला लागला होता. त्याचप्रमाणे, २७ नोव्हेंबर २०१४ रोजी ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजच्या डोक्याला सामन्यादरम्यान बाउन्सर बॉल लागला आणि अनेक दिवस कोमात राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यंदा प्रत्येक घरात ‘या’ दिग्गजांचा आवाज घुमणार, वाचा आशिया चषकातील समालोचकांची संपूर्ण यादी
शार्दूलचा गोल्डन हँड अन् संजूच्या कामगिरीच्या जोरावर भारताचा मालिका विजय
कोहलीच्या फॉर्मवर आता चहलची गूगली! म्हणाला, ‘आपण फक्त…’