भारतीय संघाचा टी20 क्रिकेटचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये फारच संघर्ष करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तीन वेळा सूर्यकुमार यादव गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद) झाला. मात्र, असे असूनही भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला विश्वास आहे की, सूर्यकुमार आयपीएल 2023 स्पर्धेच चांगली कामगिरी करेल. त्याने सांगितले की, सूर्या टी20चा शानदार क्रिकेटपटू आहे आणि आयपीएलमधून तो जेव्हा टी20त खेळेल, तेव्हा त्याचा आत्मविश्वासही वाढेल.
तीन सामन्यात शून्यावर बाद
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र, तो या संधीचं सोनं करण्यात सपशेल अपयशी ठरला. हा फलंदाज तिन्ही सामन्यात पहिल्या चेंडूवर शून्य धावेवर बाद झाला. त्यामुळे त्याचे नाव सलग तीन वेळ वनडे क्रिकेटमध्ये शून्य धावेवर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नोंदवले गोले.
काय म्हणाला दिनेश कार्तिक?
माध्यमांशी बोलताना दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला की, “हे प्रत्येक फलंदाजासोबत झाले आहे. हे जाणून घेणे खूपच रंजक आहे की, अजित आगरकर ऑन-एअर होता, तेव्हा सूर्यकुमार यादव तिसऱ्यांदा बाद झाला. तो या काळातून गेला आहे, जिथे तो शून्यावर बाद झाला होता. प्रत्येक फलंदाज यातून जातो. प्रत्येकाला त्याच्याविषयी वाईट वाटत राहिले. कारण, त्याच्याकडे त्याप्रकारची प्रतिभा आहे. मात्र, टी20 हा वेगळा क्रिकेट प्रकार आहे आणि त्यात तो शानदार आहे. त्यामुळे तो जेव्हा मुंबई इंडियन्स संघाची जर्सी परिधान करतो, तेव्हा तो एक वेगळा खेळाडू आहे. मागील काही वर्षांमध्ये त्याने याच क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी केली आहे, हे जाणून त्याचा ड्रेसिंग रूममध्ये गेल्याने आत्मविश्वास पुन्हा वाढेल.”
गावसकरांची प्रतिक्रिया
खरं तर, भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही सूर्यकुमारला वनडे मालिकेतील अपयश विसरून आयपीएलवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले की, “तीन वेळा सूर्यकुमार पहिल्या चेंडूवर बाद झाला. हे म्हणणे कठीण आहे की, काय चुकीचे घडत आहे. होय, पहिल्या दोन सामन्यात स्टार्कने चांगली गोलंदाजी केली, पण तो थोडा चिंतेत असेल. त्याला हे समजले पाहिजे की, कोणत्याही खेळाडूसोबत असे होऊ शकते. जगातील शानदार खेळाडूंसोबत असे घडले आहे. माझा विश्वास आहे की, त्याने या तीन सामन्यांना विसरले पाहिजे आणि आयपीएलवर लक्ष दिले पाहिजे. तिथे धावा काढल्या पाहिजेत.”
इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मुंबईचा स्पर्धेतील पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer dinesh karthik backs suryakumar yadav to do well in ipl 2023 after odi series failure)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये राजकारण! सूर्याच्या फ्लॉप शोमुळे काँग्रेस नेत्याचा बीसीसीआयवर निशाणा, सॅमसनला मिळाला सपोर्ट
वनडेतील 265 डावांनंतरही चमकतोय ‘किंग’ कोहली, पठ्ठ्याची सरासरी आहे सचिन अन् धोनीपेक्षाही जास्त; वाचाच