ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने १८ मार्च रोजी भारतीय मूळ असलेली गर्लफ्रेंड विनी रमणसोबत ख्रिश्चन पद्धतीने संसार थाटला आहे. मॅक्सवेलने नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो त्यांच्या हळदी समारंभातील आहेत. आता सोशल मीडियावर काही चाहत्यांनी मॅक्सवेलला ‘अर्धा भारतीय’ सांगितले आहे. इतकेच नाही, तर २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १५व्या हंगामात त्याला भारतीय म्हणून खेळण्यासही सांगितले आहे.
ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना आपल्या लग्नाची बातमी दिली होती. मॅक्सवेल आणि विनी खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता मॅक्सवेल आयपीएलच्या १५व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळताना दिसणार आहे. बेंगलोर संघाने त्याला रिटेन केले होते. या हंगामात फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) बेंगलोरचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
बेंगलोर संघही इतर संघांप्रमाणे ४ परदेशी खेळाडूंना एखाद्या सामन्यात संधी देऊ शकतो. प्रत्येक संघाला एका सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त ४ परदेशी खेळाडूंना ठेवण्याची परवानगी असते. अशात मॅक्सवेलही परदेशी खेळाडू म्हणूनच खेळणार आहे. मात्र, काही युजर्स असे म्हणत आहेत की, आता मॅक्सवेल लग्नानंतर अर्धा भारतीय बनला आहे.
एका युजरने विचारले की, “मॅक्सवेलला आता भारतीय खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये संधी दिली जाऊ शकते का? कारण तो आता अर्धा भारतीय झाला आहे.”
Dear @IPL can we play Maxwell as an Indian player? He is half Indian now. pic.twitter.com/yi0aa0FuYU
— Sai (@akakrcb6) March 22, 2022
मॅक्सवेलचे नाव बदलण्याचीही होतेय चर्चा
मॅक्सवेलने हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याचा भारतीय लूक पाहायला मिळत आहे. त्याने इंडो-वेस्टर्न डिझाइनमधील कुर्ता-पायजमा घातलेला दिसत आहे. दुसरीकडे विनीदेखील साडी नेसलेली दिसत आहे. यापूर्वी त्याने आपल्या लग्नाची खुशखबर इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत दिली होती.
https://www.instagram.com/p/CbRZdServhU/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
विशेष म्हणजे, आता काही युजर्स मॅक्सवेलचे नावही बदलत आहेत. एक युजर म्हणाला की, “मॅक्सवेलचे नाव बदलण्याची वेळ आली आहे. चला तर त्याचे नाव ग्लेन रमण असं ठेवूया.”
https://twitter.com/RCBSG17/status/1506183885004029955
मॅक्सवेलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ७ कसोटी सामने, ११६ वनडे सामने आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १ शतक ठोकत ३३९ धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत २ शतक आणि २२ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ३२३० धावा केल्या आहेत. दुसरीकडे, त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३ शतके आणि ९ अर्धशतकांसह १९८२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चर्चा धोनीच्या उत्तराधिकारीची; रैना म्हणतोय, ‘या’ चार खेळाडूंमध्ये आहे क्षमता
जेसन रॉयवर दंडासहित २ सामन्यांची बंदी! इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून कडक कारवाई
आयपीएल २०२२ सामन्यांच्या तिकीट विक्रीला कधी होणार सुरुवात? घ्या जाणून