Hamza Saleem Dar 193 Not Out: एकेकाळी 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतक झळकावण्याची कल्पनाही करू शकत नव्हते. मात्र, आजच्या काळात क्रिकेट ज्या वेगाने खेळले जात आहे, ते पाहता हे म्हणणे वावगे ठरणार नाही की, टी20च काय तर टी10 क्रिकेट स्पर्धेतही फलंदाज द्विशतक मारू शकतात. होय, ही अपेक्षा युरोपियन क्रिकेटमार्फत जागी झाली. या स्पर्धेतील एका सामन्यात फलंदाजाने अवघ्या 43 सामन्यात 193 धावा चोपल्या. यावेळी तो नाबादही राहिला. ही टी10मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.
अवघ्या 43 चेंडूत नाबाद 193
झाले असे की, फलंदाज हामजा सलीम दार (Hamza Saleem Dar) या विस्फोटक फलंदाजाचे टी10 क्रिकेट स्पर्धेतील द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकले. या फलंदाजांने टी10 क्रिकेट स्पर्धेच्या एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर केला.
युरोपियन टी10 क्रिकेट स्पर्धेतील एक सामना कॅटलुन्या जग्वार विरुद्ध सोहल हॉस्पिटलटेट संघात खेळला गेला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करताना जग्वार संघाने निर्धारित 10 षटकात एकही विकेट न गमावता 257 धावांचा भलामोठा डोंगर उभारला. यादरम्यान त्यांचा फलंदाज हामजा सलीम दार याने 43 चेंडूत 193 धावांची विश्वविक्रमी खेळी केली. त्याच्या खेळीत 14 चौकार आणि तब्बल 22 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 449 इतका होता.
𝗪𝗢𝗥𝗟𝗗 𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗 𝗞𝗡𝗢𝗖𝗞!🤯
Hamza Saleem Dar's 43-ball 1️⃣9️⃣3️⃣ not out is the highest individual score in a 10-over match.😍 #EuropeanCricket #EuropeanCricketSeries #StrongerTogether pic.twitter.com/4RQEKMynu2
— European Cricket (@EuropeanCricket) December 6, 2023
टी10 क्रिकेटमध्ये यापूर्वी एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम लेउस डू प्लोय याच्या नावावर होता. त्याने यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी हंगेरीकडून 40 चेंडूत 163 धावांची नाबाद खेळी केली होती.
WORLD RECORD ALERT IN CRICKET…!!!!!
Hamza Saleem Dar smashed unbeatan 193* runs in just 43 balls including 14 fours and 22 Sixes with 448.84 strike rate in European T10 Match – THIS IS JUST INSANE FROM HAMZA. pic.twitter.com/b7cOISf1Ud
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 8, 2023
तसेच, सोहल हॉस्पिटलटेट संघाचा गोलंदाज मोहम्मद वारिस याने त्याच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये सर्वाधिक 73 धावा खर्च केल्या. वारिसच्या एका षटकात 6 षटकारांचीही बरसात झाली. त्यात त्याने 43 धावा खर्च केल्या. सोहल हॉस्पिटलटेटच्या गोलंदाजीदरम्यान फक्त एक षटक असे होते, ज्यात 20 पेक्षा कमी धावा निघाल्या.
कॅटलुन्या जग्वार संघाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना हॉस्पिटलटेट संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांना निर्धारित 10 षटकात 8 विकेट्स गमावत 104 धावाच करता आल्या. अशाप्रकारे जग्वार संघाने हा सामना 153 धावांच्या फरकाने आपल्या नावावर केला. (cricketer hamza saleem dar 193 runs in 43 balls t10 cricket highest individual score european cricket see video)
हेही वाचा-
‘त्यांना रचिनची गरज…’, IPL 2024 Auctionपूर्वी इरफान पठाणचा ‘या’ संघाला मोलाचा सल्ला
याला म्हणतात मॅच! अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेचा 1 विकेटने रोमांचक विजय, आयर्लंडला चारली धूळ; सिंकदर ठरला हिरो