रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेत शानदार प्रवास सुरू आहे. संघाने पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. तिसरा सामना शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पाकिस्तानविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेतही अव्वलस्थानी विराजमान झाला. असे असले, तरीही संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने सामन्यादरम्यान केलेली कृती सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. आता त्याविषयी पंड्याने खुलासा केला आहे.
पंड्याची कमाल
या सामन्यात पाकिस्तानच्या डावातील 13वे षटक हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने टाकले होते. यादरम्यानच तो चेंडू दोन्ही हातात पकडून मंत्रोच्चार केल्यासारखे दिसला. यानंतर तो त्यावर फुकला आणि पुढच्याच चेंडूवर त्याला विकेट मिळाली. हा तिसरा चेंडू होता आणि स्ट्राईकवर इमाम उल हक होता. यावेळी पंड्याने चेंडू टाकताच बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हातात गेला. त्यामुळे इमाम 38 चेंडूत 36 धावा करून झेलबाद झाला.
हार्दिक पंड्याने स्वत:ला शिवी दिली
पंड्याचा हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा चाहत्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली की, पंड्याने नक्की काय केले होते? आता याविषयी अष्टपैलूने स्वत:च खुलासा केला आहे. सामन्यानंतर माजी दिग्गज गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्याशी बोलताना पंड्याने मजेशीर अंदाजात म्हटले की, “मी स्वत:ला शिवी दिली होती.”
‘मी स्वत:ला प्रेरित करत होतो’
सामन्यानंतर खुलासा करत तो म्हणाला की, “मी स्वतशीच बोलत होतो. खरं तर, मी स्वत:ला शिवी दिली. मी स्वत:ला प्रेरित करत होतो की, वेगळं काही करू नको, योग्य ठिकाणी चेंडू टाक.”
What was that mantra ??? 😳 #INDvsPAK #HardikPandya pic.twitter.com/4jNYiOpfVf
— Sonu Prajapati (@TechMumbaikar) October 14, 2023
सामन्याच्या नियोजनाविषयी बोलताना तो म्हणाला, “माझ्या मते, मी आणि सिराज बोललो होतो की, एकसारख्या खेळपट्टीवर गोलंदाजी केली, जास्त काही प्रयत्न करणार नाहीत. जसे मागील सामन्यात बुमराहने केले आहे.”
https://twitter.com/celluloidpanda/status/1713129793888362856
पुढील आव्हान बांगलादेशचे
या सामन्यात पाकिस्तानने भारताला 192 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 30.3 षटकात 3 विकेट्स गमावत पार केले. यावेळी भारताकडून रोहित शर्मा (86) आणि श्रेयस अय्यर (नाबाद 53) यांनी अर्धशतक ठोकले. या विजयासह भारताने न्यूझीलंडला मागे टाकत नेट रनरेटच्या (+1.821) आधारे गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले. आता या विजयानंतर भारतीय संघाला पुढील सामन्यात बांगलादेशविरुद्ध भिडायचे आहे. हा सामना पुणे येथील एमसीए मैदानावर खेळला जाणार आहे. (cricketer hardik pandya on mantra on the ball during india vs pakistan match in world cup 2023)
हेही वाचा-
‘मास्टर ब्लास्टर’ने उडवली शोएब अख्तरची खिल्ली; ट्वीट करत जे काही म्हणाला, त्याची सर्वत्र रंगलीय चर्चा, वाचाच
‘ही माझी पॉवर…’, अंपायरच्या ‘त्या’ प्रश्नाला रोहितचे बायसेप दाखवत उत्तर, कर्णधाराच्या तोंडूनच ऐका