---Advertisement---

नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! रोहितला पछाडत बनली ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली भारतीय कर्णधार

On: रविवार, जुलै 9, 2023 9:59 PM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

भारतीय महिला संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश महिला विरुद्ध भारतीय महिला संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने झाली. मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 09 जुलै) ढाका येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने यावेळी नाबाद अर्धशतकी खेळी साकारत संघाला विजयी सुरुवात करून दिली. तसेच, तिने खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, तिने भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रमही मोडीत काढला आहे.

हरमनप्रीतचा विक्रम
या सामन्यात बांगलादेश संघाच्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने 35 चेंडूत नाबाद 54 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या धावा करताना तिने 2 षटकार आणि 6 चौकारांचाही पाऊस पाडला. तिच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघ 7 विकेट्सने विजय मिळवण्यात यशस्वी झाला. सामन्यातील कामगिरीसाठी हरमनप्रीतला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. अशाप्रकारे, हरमनने भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला पछाडत इतिहास रचला.

खरं तर, हरमनप्रीत टी20 पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात सर्वाधिक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार (Most Player of the Match Award) जिंकणारी कर्णधार बनली आहे. हरमनप्रीतच्या नावावर आता 6 प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारांची नोंद झाली आहे. यापूर्वी रोहितच्या नावावर 5 पुरस्कारांचा विक्रम होता. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर 3, तर मिताली राज (Mithali Raj) हिच्या नावावर 2 पुरस्कारांची नोंद होती.

सर्वाधिक टी20 प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारे भारतीय कर्णधार
6- हरमनप्रीत कौर*

5- रोहित शर्मा
3- विराट कोहली
2- मिताली राज

सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 5 विकेट्स गमावत 114 धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय महिला संघाने 16.2 षटकात 3 विकेट्स गमावत 118 धावा करून पार केले. यावेळी भारतीय संघाकडून हरमनप्रीतव्यतिरिक्त (नाबाद 54) स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 38 धावांचे योगदान दिले. तसेच, जेमिमा रॉड्रिग्ज हिने 11 धावा, तर यास्तिका भाटिया हिने नाबाद 9 धावा केल्या.

पुढील सामना कधी?
बांगलादेश महिला विरुद्ध भारतीय महिला (Bangladesh Women vs India Women) संघात आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (दि. 11 जुलै) खेळला जाणार आहे. हा सामनादेखील ढाका येथील शेर ए बांगला स्टेडिअमवर पार पडणार आहे. (cricketer harmanpreet kaur becomes most t20i pom awards won by indian captain surpass rohit sharma)

महत्वाच्या बातम्या-
वोक्स ठरला इंग्लंडचा कमबॅक हिरो! अष्टपैलू कामगिरीने राखली बॅझबॉलची इभ्रत
खास विक्रमासह ब्रूकने इंग्लंडचा विजय केला गोड, बनला कसोटीत वेगवान 1000 धावा करणारा फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---