महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्स संघाने बुधवारी (दि. 1 मार्च) त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौर हिला कर्णधार म्हणून निवडले आहे. महिला प्रीमिअर लीग स्पर्धेच्या उद्घाटनाच्या हंगामासाठी हरमनप्रीत मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याची माहिती मुंबईने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला कर्णधार म्हणून नेमल्याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी नीता अंबानी यांच्या वक्तव्याचा समावेश केला आहे. ट्वीटमध्ये “हरमनप्रीत मुंबई इंडियन्सच्या उद्घाटनाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. ती आमच्या संघाला सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा देईल.”- श्रीमती नीता एम. अंबानी, असे लिहिले आहे.
“We are thrilled to have Harmanpreet as the captain of Mumbai Indians’ first-ever women’s cricket team. She will inspire our team to play their best cricket.” – Mrs. Nita M. Ambani
More on Skipper Harman for #MumbaiIndians:#OneFamily #AaliRe #WPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 1, 2023
हरमनप्रीतकडे जबरदस्त अनुभव आहे. कारण, तिने 150हून अधिक टी20 सामने खेळले आहेत. हरमनप्रीतने 20 वर्षांच्या वयात भारतीय महिला क्रिकेट संघाकडून टी20 पदार्पण केले होते. तसेच, ती अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडूदेखील आहे. याव्यतिरिक्त महिला वनडे विश्वचषकात बाद फेरीत तिने नाबाद 171 धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळीदेखील साकारली आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करतो. त्याने संघाला 5 वेळा विजेतेपद जिंकून दिले आहे. अशात हरमनकडूनही संघाला अशीच अपेक्षा असेल.
#powerfullgirls
Most sixes in women's international t20I
1.Deandra Dottin(GG)
2.Sophie Devine(RCB)
3.Harmanpreet Kaur(MI)
4.Smriti Mandhana(RCB)
5.Shefali Varma(DC) pic.twitter.com/BrgyOAHd3n— Ashutosh (@cricwriterash) March 1, 2023
महिला प्रीमिअर लीगसाठी मुंबई इंडियन्स संघ
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक संघात शार्लोट एडवर्ड्स (मुख्य प्रशिक्षक), झुलन गोस्वामी (गोलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक), देविका पळशीकर (फलंदाजी प्रशिक्षक) आणि लिडिया ग्रीनवे (क्षेत्ररक्षक प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तसेच, नॅट सायव्हर ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमन जोत कौर, धारा गुर्जर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमिरा काला, सोनम यादव, नीलम बिश्त आणि जयंतीमणी कलिता यांचा संघात समावेश आहे.
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात खेळला जाणार आहे. (Cricketer Harmanpreet Kaur to lead Mumbai Indians in the WPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी प्रतिष्ठा घेऊन आलेला ऑसी फलंदाज ठरला जड्डूसमोर खोटा! आत्तापर्यंत इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता
ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणणाऱ्या पंतची अपघाताच्या 2 महिन्यांनंतर मोठी प्रतिक्रिया; काय म्हणाला वाचाच