Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

WPL Auction: हरमनच्या नेतृत्वात सुपरस्टार्सने सजली मुंबई इंडियन्स! पहिल्याच वर्षी ट्रॉफीचे लक्ष्य

February 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Harmanpreet-Kaur

Photo Courtesy: Twitter/ICC


पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग या स्पर्धेचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. मुंबई येथे झालेल्या लिलावात भारतीय तसेच विदेशी खेळाडूंवर मोठ्या बोल्या लागताना दिसल्या. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारानंतर आता भारतीय महिला संघाची कर्णधार देखील मुंबई फ्रेंचाईजीसाठी खेळताना दिसेल.

₹1⃣2⃣crores spent💰
1⃣7⃣ buys🔨#OneFamily💙

Who was our favourite pick from the #WPLAuction, Paltan?🧐#MumbaiIndians #AaliRe

— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2023

 

मुंबई संघ आता हरमनच्या नेतृत्वात वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात खेळताना दिसेल. तिच्यासह या संघात अनेक आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय खेळाडू हात आजमावताना दिसणार आहेत. तिच्यासह या संघात सध्या भारतीय संघाचा भाग असलेल्या यष्टीरक्षक यास्तिका भाटिया व अष्टपैलू पुजा वस्त्राकार दिसतील. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक अनुभवी खेळाडूंचा या संघात समावेश झाला आहे.

KLASSIC KAUR 🔨 180L ☑️ #OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPLAuction pic.twitter.com/u3Qk3998HE

— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2023

 

नुकतीच मागील वर्षीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकलेली इंग्लंडच नताली सिवर, वेस्ट इंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूज, न्यूझीलंडची अव्वल अष्टपैलू एमेलिया कर व हिदर ग्रॅहम या विदेशी खेळाडू मुंबईसाठी खेळताना दिसतील. तसे देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडलेल्या हुमायरा काझी, सोनम यादव तसेच अमनज्योत कौर यांचा देखील मुंबईच्या संघात समावेश आहे.

मुंबईच्या या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी देखील अशाच दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला गेला. इंग्लंडचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू चार्लेट एडवर्ड व भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी या संघाच्या मुख्य प्रशिक्षक तसेच मार्गदर्शक राहतील.

WPL 2023 साठी मुंबई इंडियन्स संघ-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, पुजा वस्त्राकार, नताली सिवर, हायली मॅथ्यूज, एमेलिया कर, हिदर ग्रॅहम, टायरन क्लो, इसाबेल वोंग, धारा गुजर, अमनज्योत कौर, सायका इशाकू, हुमायरा काझी, सोनम यादव, प्रियंका बाला, जिनमताई काला, निलम बिश्त.

(Mumbai Indians Sqaud For WPL 2023 Harmanpreet Kaur Lead)


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCIWomens

पाकिस्तानला पस्त केल्यानंतर विराटनेही केले 'हरमन ब्रिगेड'चे कौतुक, खास ट्विट करत लिहिले...

धक्कादायक : मालाडमध्ये कबड्डी स्पर्धा खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल

Photo Courtesy: Twitter/ BCCI

गोष्ट जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेझ रसूलची, चोरीचा झालेला आरोप

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143