---Advertisement---

पंतचा सराव पाहून दिल्ली कॅपिटल्सचे कोच खुश! फॉर्म पाहून काय म्हणाले वाचाच । IPL 2024

Rishabh-Pant
---Advertisement---

रिषभ पंत इंडियन प्रीमियर लीग 2024 मधून मैदानात पुनरागमन करत आहे. आगामी आयपीएल हंगामाताला अवघ्या काही दिवसांचा वेळ राहिला आहे. 22 मार्च रोजी आयपीएल हंगामाची सुरुवात होणार आहे. सर्व आयपीएल संघांनी आगामी हंगामासाठी सरावाला सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ विशाखापट्टणममध्ये सराव करत आहे. सर्वांच्या नजरा कर्णधार रिषभ पंत याच्या पुनरागमनाकडे लागल्या आहेत. अशात सराव सत्रात पंतला सराव करताना पाहून दिल्ली कॅपिटल्सचे सहायक प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासोबत रिषभ पंत (Rishabh Pant) देखील विशाखापट्टणममध्ये सराव करत आहे. सराव सत्रात सर्वजण पंतच्या हालचाली निरखून पाहत आहेत. तब्बल 14 महिन्यांनंतर यष्टीरक्षक फलंदाज प्रोफेशनल क्रिकेट खेळताना दिसणार आहे. अशात दिल्लीच्या पहिल्या सराव सत्रात त्याने भाग घेतला. त्याची फलंदाजी पाहून प्रवीण आम्रे () यांनी खास प्रतिक्रिया दिली.

पंतची फिटनेस पाहून आम्रे म्हणाले, “एक प्रशिक्षक आणि वैयक्तिक देखील पंतला फलंदाजी करताना पाहून आनंद होत आहे. मला असे वाटलेच नाही की, तो मोठ्या काळानंतर फलंदाजी करत आहे. त्याचा तोच अप्रतिम बॅट स्विंग पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पंतने स्वतःला तयार केले, याचे श्रेय त्यालाच जाते. कारण हे खरंच सोपे नव्हते. यातून त्याची मानसिकता किती मजबूत आहे आणि क्रिकेट खेळण्यासाठी तो किती उत्सुक आहे, हेदेखील समजते.”

दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये पंतल दिल्लीहून घरी म्हणजेच रुरकीकडे जात होता. गाडीत तो एकटा असून वाटेत त्याचा अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की, गाडीच्या काही पलट्या झाल्या. त्याची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने यष्टीरक्षक फलंदाज गाडी पेट घेण्याआधीच तो बाहेर पडला होता. (Delhi Capitals coach is happy after watching Pant’s practice! Read what they said after seeing the form. IPL 2024)

महत्वाच्या बातम्या – 
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी 20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर
कधी पंचांशी वाद घालतो तर कधी चाहत्याला थप्पड मारतो, क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ शाकिब अल हसन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---