---Advertisement---

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी 20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर

India Vs Pakistan
---Advertisement---

येत्या 2 जूनपासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि आयर्लंड यांच्यात 5 जून रोजी सामना होणार आहे. यानंतर टीम इंडिया 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सामन्याच्या दिवशी जर पावसानं खोळंबा घातला तर सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. आयसीसीनं भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी एक राखीव दिवस असेल. म्हणजेच या दिवशी पावसानं व्यत्यय आणला तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. आयसीसीच्या वार्षिक बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय ग्रुप स्टेज आणि सुपर-8 सामन्यांचा निकाल जाहीर होण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 5 षटके खेळावी लागतील. तर बाद फेरीत दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 10 षटकं खेळावी लागतील. त्या आधारेच विजेत्याची निवड केली जाईल.

या टी 20 विश्वचषकाची सुरुवात अमेरिका विरुद्ध कॅनडा सामन्यानं होणार आहे. दोन्ही संघ ग्रांप्री स्टेडियममध्ये एकमेकांच्या आमनेसामने येतील. भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 27 जून रोजी होणार आहेत. यानंतर 29 जून रोजी विजेतेपदाचा सामना होईल. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे.

भारतीय संघानं 2007 चा पहिला टी 20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर टीम इंडियाला कधीही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2014 मध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला होता. त्यावर्षी श्रीलंकेनं अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून प्रथमच टी20 विश्वचषक जिंकला होता.

टी20 विश्वचषकाचे आतापर्यंतचे विजेते-

2007- भारत

2009 – पाकिस्तान

2010 -इंग्लंड

2012 – वेस्ट इंडिज

2014 – श्रीलंका

2016 – वेस्ट इंडिज

2021 – ऑस्ट्रेलिया

2022 – इंग्लंड

महत्त्वाच्या बातम्या-

कधी पंचांशी वाद घालतो तर कधी चाहत्याला थप्पड मारतो, क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ शाकिब अल हसन

मुंबई इंडियन्सला मिळाला नवा मलिंगा? ईशानचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

‘चोराच्या उलट्या बोंबा’…बॉल ग्लोव्हजवर आदळताच अंपायरनं धावा कापल्या, मोहम्मद रिझवाननं रागाच्या भरात केलं असं काही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---