क्रिकेटच्या मैदानात अनेकदा पंचांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य नसतो. पण तरीही हाच निर्णय अंतिम मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी एका असा नियम बनवण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे लाईव्ह सामन्यात नेहमी येणारी एक अडचण मार्गी लागेल. दोन षटकांच्या मध्ये गोलंदाज बदलताना अनेकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्त वेळ घेतो. याचाच उपाय म्हणून आयसीसी नवा नियम अमलात आणणार आहे.
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून नवीन षटकाची सुरुवात करताना जास्त वेळ खर्च केला जातो. नवीन गोलंदाज निवडताना किंवा इतर काही कारणास्तव पुढचे षटक उशीरा सुरू होते. याच कारणास्तव आयसीसीकडून वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात ‘स्टॉप क्लॉक’ लावले जाणार आहे. हा स्टॉप क्लॉक नियम लागू झाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढचे षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांचा वेळ दिला जाईल.
जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने पुढचे षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला, तर त्या संघाला दंड लावला जाईल. माध्यमांतील वृत्तांनुसार आगामी टी-20 विश्वचषकापासून हा नियम आयसीसी अमलात आणणार आहे. प्रत्येक संघाला या नियमांचे पालन करावे लागणार यात शंका नाही. माहितीनुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून दोन वेळा या नियमाचे उल्लंघन झाले, तर पंचांकडून त्यांना चेतावणी दिली जाईल. पण तिसऱ्या चुकीला त्या संघावर 5 धावांचा दंड लावला जाईल.
प्रत्येक षटक संपल्यानंतर मैदानातील स्क्रीनवर 60 सेंकंडाचे स्टप क्लॉक दिसेल. तिसऱ्यां पाचांकडून हा घड्याळ नियंत्रित केले जाईल. हे 60 सेकंद संपल्यानंतर मैदानी गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुचना करतील. डीआरएस घेताना देखील अगदी अशाच प्रकारचे स्टॉप क्लॉक मैदानात दिसते, ज्यावर 15 सेकंदांचा वेळ असतो. डिसेंबर 2023 पासून नवीन स्टॉप क्लॉक नियमाची चाचणी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. येत्या एप्रिल महिन्यात ही चाचणी संपणार आहे. दुबईत आयसीसीच्या बैठकीत या नियमाला मंजूरी देखील मिळाली आहे. (Big decision by ICC to clear the problem in ODI and T20 international cricket)
महत्वाच्या बातम्या –
कधी पंचांशी वाद घालतो तर कधी चाहत्याला थप्पड मारतो, क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ शाकिब अल हसन
‘चोराच्या उलट्या बोंबा’…बॉल ग्लोव्हजवर आदळताच अंपायरनं धावा कापल्या, मोहम्मद रिझवाननं रागाच्या भरात केलं असं काही