पुणे (15 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज ‘ब’ गटातील प्रत्येक संघाच्या गटातील 4 लढती पूर्ण झाल्या. सांगली, पालघर, नाशिक व कोल्हापूर संघांनी आज विजय मिळवले. आजच्या सामन्याच्या निकाल नंतर नंदुरबार संघ पहिल्या क्रमांकावर तर सांगली, कोल्हापूर व पालघर संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.
आजच्या पहिल्या सामन्यात सांगली संघाने सातारा संघावर मात देत सामना 56-27 असा एकतर्फी जिंकला. सांगली कडून तुषार खडगे व अभिराज पवार ने सुपर टेन करत चढाईत प्रत्येकी 15 गुण मिळवले. तर नवाज देसाई ने पकडीत 5 गुण मिळवले. सातारा कडून कुणाल जाधव व प्रणव धुमाळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आजच्या दुसऱ्या सामन्यात पालघर संघाने धाराशिव संघावर सहज मिळवत स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवला. यश निंबाळकर व पियुष पाटील ने सुपर टेन पूर्ण केला.
आजच्या तिसऱ्या महत्वपूर्ण सामन्यात नंदुरबार संघाने अटीतटीच्या लढतीत 33-31 अशी बाजी मारली. मध्यंतराला 17-08 अशी आघाडी नाशिक संघाकडे होती. त्यानंतर नंदुरबारच्या जयेश महाजन ने अष्टपैलू खेळ करत संपूर्ण सामन्याला कलाटणी दिली. जयेश महाजन ने चढाईत 17 तर पकडीत 4 गुण मिळवले. युवा कबड्डी सिरीजचया इतिहासात पहिल्यांदाच एका खेळाडूला सामन्यातील तिन्ही बक्षिसे मिळाली. आजच्या चौथ्या लढतीत कोल्हापूर संघाने 53-10 असा एकतर्फी विजय मिळवला. कोल्हापूरच्या सौरभ फगारे ने सुपर टेन पूर्ण केला. (Winning four for Nandurbar team, while third win for Sangli, Kolhapur, Palghar team)
संक्षिप्त निकाल:-
सांगली जिल्हा 56 – सातारा जिल्हा 27
पालघर जिल्हा 43 – धाराशिव 17
नाशिक जिल्हा 31 – नंदुरबार 33
लातुर जिल्हा 10 – कोल्हापूर 53
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या विजयासह सांगली संघाची पहिल्या क्रमांकावर झेप
अटीतटीच्या लढतीत नंदुरबार संघाची नाशिक संघावर मात