इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता आयपीएलपूर्वी आर्चर बेंगळुरूला पोहोचला असून त्याने तेथे एक चमत्कार केला आहे.
आयपीएलच्या 17व्या हंगामापूर्वी तो एका सामन्यात आपल्याच संघाविरुद्ध खेळताना पहायला मिळाला होता. त्यानंतर तो गोलंदाजी करताना देखील अतिशय तुफान फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते. याबरोबरच जोफ्रा आर्चर सध्या त्याच्या काउंटी संघ ससेक्ससह बरोबर उपस्थित आहे. तर यावेळी ससेक्सने बेंगळुरूमध्ये त्यांचे 10 दिवसांचे शिबिर सुरू आहे.
दरम्यान, लँकेशायरचे प्रशिक्षण शिबिर बेंगळुरूमध्येही सध्या सुरू आहे. तर आगामी काउंटी हंगामापूर्वी संघ येथे तयारी करत आहेत. यावेळी ससेक्सचा सामना कर्नाटकच्या घरच्या संघाशी सामना सुरूच आहे. तेव्हा आर्चरने पहिल्या दिवशी गोलंदाजी केली नव्हती पण शुक्रवारी असे काही घडले की त्याने आपल्याच संघाविरुद्ध गोलंदाजी केली आहे.
Jofra Archer playing for Karnataka today https://t.co/TaFZUFl8D8
— absy (@absycric) March 15, 2024
याबरोबरच शुक्रवारी आर्चर कर्नाटककडून गोलंदाजी करताना दिसला आणि त्याने आपल्याच संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी त्याने दोन विकेट घेतल्या आहेत, त्यापैकी एक क्लीन बोल्ड झाला आहे. तसेच त्याला आयपीएल 2023 मध्ये उजव्या कोपराला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
Wicket – Alsop out lbw, b Archer
The KSCA XI’s newest addition looks like a decent player tbf. 😅 pic.twitter.com/KXOTr6AgRI
— Sussex Cricket (@SussexCCC) March 15, 2024
दरम्यान, टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चर महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. दुखापतीमुळे आर्चरला यंदाचा वनडे वर्ल्ड कप खेळता आला नव्हता. त्यामुळे इंग्लंडला मोठा तोटा झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडने ‘नो आयपीएल’ची मोहिम राबवली आहे. इंग्लंड क्रिकेटने निर्णय घेतला आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आर्चर वर्ल्ड कपपर्यंत तंदुरुस्त होण्याची दाट शक्यता व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-