क्रिकेटटॉप बातम्या

‘चोराच्या उलट्या बोंबा’…बॉल ग्लोव्हजवर आदळताच अंपायरनं धावा कापल्या, मोहम्मद रिझवाननं रागाच्या भरात केलं असं काही

‘चोराच्या उलट्या बोंबा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. याचा अर्थ स्वतःहून चूक केली तरी इतरांना दोष देणं. पाकिस्तान सुपर लीग (PSL 2024) मध्ये मुलतान सुल्तान्सचा कर्णधार मोहम्मद रिझवानच्या कारनाम्यानं या म्हणीचा प्रत्यय आला.

स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रिझवानकडून चूक झाली, मात्र तो उलट यावरून पंचाबरोबरच भांडायला लागला. रिझवाननं केलेल्या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली मुलतान सुलतान आणि पेशावर झाल्मी यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मोहम्मद रिझवानच्या चुकीमुळे विरोधी संघाला पेनल्टी म्हणून पाच धावा देण्यात आल्या.

पेशावर झल्मीच्या डावाच्या 11 व्या षटकात क्रीजवर उपस्थित असलेल्या टॉम कोहलर-कॅडमोरनं खुशदिल शाहच्या चेंडूवर डीप फाइन लेगच्या दिशेनं एक शॉट खेळला. हा चेंडू पकडण्यासाठी विकेटकीपर मोहम्मद रिझवान स्वत: धावला. त्या आधी रिझवाननं आपले विकेटकीपिंग ग्लोव्हज काढून जमिनीवर फेकले होते. सहसा यष्टिरक्षक असं करतात, जेणेकरुन ते चेंडू चांगल्या प्रकारे फेकू शकतील.

मात्र रिझवाननं चेंडू स्टंपच्या दिशेने फेकताच चेंडू जमिनीवर पडलेल्या ग्लोव्हजला लागला. चेंडू ग्लोव्हजवर आदळला असल्याचं पाहून मैदानावरील पंचांनी पेनल्टी म्हणून 5 धावा दिल्या. असा दंड क्रिकेट नियम 28.2.1.3 नुसार दिला जातो. हेल्मेट किंवा ग्लोव्हज सारखी यष्टीरक्षकाची कोणतीही वस्तू मैदानावर राहिल्यास, विरुद्ध संघाला पाच धावा दिल्या जातात.

मात्र चूक करणाऱ्या रिझवाननं मैदानावर उपस्थित पंच आलिमदार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. बराच वेळ वाद केल्यानंतर अखेर रिझवानला आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य करावं लागलं. पंचांनी रिझवानला चांगलं समजावून सांगितलं. त्यानंतरच त्यानं आपली चूक मान्य केली.

 

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीनं प्रथम फलंदाजी करताना 146/7 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुलतान संघानं 9 चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं. या सामन्यात सामनावीर मुलतानचा गोलंदाज उसामा मीरनं 2/16 शानदार गोलंदाजी केली. तर यासिर खाननं 54 धावांची  खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मामुळे वाचलं हार्दिक पांड्याचं करिअर? माजी क्रिकेटपटूनं केला मोठा खुलासा

पाच असे दिग्गज खेळाडू जे कधीच IPL मध्ये खेळू शकले नाहीत, जाणून घ्या

IPL 2024 पूर्वी ऋषभ पंत नेट्समध्ये करतोय हेलिकॉप्टर शॉटचा सराव, पाहा Viral Video

 

Related Articles