---Advertisement---

तिसऱ्या विजयासह पालघर संघ दुसऱ्या क्रमांकावर

File Photo
---Advertisement---

पुणे (15 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना पालघर विरुद्ध धाराशिव यांच्यात झाली. पालघर संघ 2 विजयासह 5 व्या क्रमांकावर होता तर धाराशिव संघ आठव्या क्रमांकावर होता. सामन्याची सुरुवात संथ झाली होती. धाराशिव संघाने 9 मिनिटाला 6-3 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर यश निंबाळकर ने चतुरस्त्र चढाया करत पालघर संघाला आघाडी मिळून दिली.

पालघर संघाने मध्यांतर पर्यत 15-09 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर पालघर संघाने आक्रमक खेळ करत आपली आघाडी वाढवली. धाराशिव कडून सुहास बाबर ने सुरुवातीला चांगले गुण मिळवले होते. पालघरच्या यश निंबाळकर ने सुपर टेन पूर्ण केला. तर पियुष पाटील ने त्याला चांगली साथ दिली.

पालघर संघाने संपूर्ण सामन्यात धाराशिव संघाला 3 वेळा ऑल आऊट करत सामना 43-17 असा जिंकला. पालघर संघाकडून यश निंबाळकर ने चढाईत 13 गुण मिळवले. तर पियुष पाटील ने सुद्धा महत्वपूर्ण 10 गुण मिळवत सुपर टेन पूर्ण केला. पालघर कडून जीत पाटील ने 3 पकडीत गुण मिळवले तर राहुल पाटील, ऋषिकेश दळवी व योगेश मोरसे यांनी पकडीत प्रत्येकी 2 गुण मिळवले. धाराशिव ने सुहास बाबर ने चढाईत 9 गुण मिळवले.

बेस्ट रेडर- यश निंबाळकर, पालघर
बेस्ट डिफेंडर- जीत पाटील, पालघर
कबड्डी का कमाल- पियुष पाटील, पालघर

महत्वाच्या बातम्या – 
‘असं क्रिकेट खेळू की…’, आयपीएल 2024 पूर्वी मुंबई कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला?
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी 20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---