---Advertisement---

पाकिस्तानला पस्त केल्यानंतर विराटनेही केले ‘हरमन ब्रिगेड’चे कौतुक, खास ट्विट करत लिहिले…

On: सोमवार, फेब्रुवारी 13, 2023 10:19 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी20 विश्वचषकाचा पहिला सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे रविवारी पार पडला. महिला संघाने टी20 विश्वचषकात भारताने धमाकेदार कामगिरी केली. पाकिस्तान संघाने भारतीय संघाला 150 धावांचे लक्ष्य दिलं होते. या आव्हानाचा पाठलाग करतांना भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला. या कामगिरीनंतर सर्व स्तरातून भारतीय महिला संघाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. यात भारतीय संघाचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज विराट कोहली याने सोशल मीडिया पोस्ट करत भारतीय संघाचे कौतुक केले.

विराटने पोस्टमध्ये लिहिले की, ‘आपल्या महिला संघाने पाकिस्तानच्या संघाविरुद्ध दबावातही शानदार कामगिरी केली आणि आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. आपला संघ प्रत्येक स्पर्धेत स्वतःला सिद्ध करत आहे. आपल्या संपूर्ण पिढीला येणाऱ्या काळात खेळण्यासाठी हा संघ प्रेरित करत आहे. विराटव्यतिरिक्त फिरकी गोलंदाज आर अश्विननेही भारतीय संघाचे कौतुक केले. त्याने लिहिले, ‘भारतीय संघाने आव्हानाचा अतिशय छान पाठलाग केला. जेमिमा आणि रिचाने चांगली कामगिरी केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका रोमांचक सामन्यातही भारतीय संघ अतिशय शांत आणि संयमी होता.’

https://www.instagram.com/p/CokeU6uvtxo/?utm_source=ig_web_copy_link

भारताच्या या विजयात जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या दोघींचा मोठा वाटा आहे. पाकिस्तानने भारतासमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला शफाली वर्मा व‌ यास्तिका भाटियाने 5.3 षटकात 38 धावांची सलामी दिली. भाटिया बाद झाल्यानंतर शफालीने जेमिमासह धावांचा वेग वाढवला. शफालीने 33 धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीतने आक्रमक 16 धावांचे योगदान दिले. जेमिमाच्या नाबाद 53 धावा तर रिचाच्या नाबाद 31 धावांच्या जोरावर भारताने 19 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा करून विजय मिळवला. या विशेष कामगिरीमुळे जेमिमाची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक 2 बळी घेतले. दीप्ती शर्मा हिच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघाला सुरुवातीला आक्रमक खेळ करता आला नाही. कर्णधार हरमनप्रीतने आक्रमक 16 धावांचे योगदान दिले.

भारतीय संघाचा दुसरा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना 15 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. भारतीय संघाची नजर सलग दुसऱ्या विजयावर असेल. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात 18 फेब्रुवारीला इंग्लंडशी, तर चौथ्या सामन्यात 20 फेब्रुवारीला आयर्लंडचा सामना करेल.

(Virat Kohli Congratulate Indian Womens Team After T20 World Cup Win Against Pakistan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!
नागपूरमध्ये चाहत्यांनी अश्विनचे केले नवे नामकरण, स्वतः सोशल मीडियावरून दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---