Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागपूरमध्ये चाहत्यांनी अश्विनचे केले नवे नामकरण, स्वतः सोशल मीडियावरून दिली माहिती

चाहत्याने दिले अश्विनला नविन नाव, पण चुक सुधारत अश्विन म्हणाला...

February 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ravichandran Ashwin

Photo Courtesy: Instagram/rashwin99


भारतीय संघातील बरेच खेळाडू सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतात. ते नेहमी त्यांचे फोटो, व्हिडिओ किंवा मजेदार किस्से शेअर करतात. त्यासोबतच चाहत्यांच्या प्रश्नांवरही तितक्याच हुशारीने उत्तरही देतात. खेळाडू मैदानावर घडलेले किस्से देखील अनेकदा शेअर करताना दिसतात. असेच काहीसे भारतीय संघाचा अनुभवी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन सोबत घडले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अश्विन सोबत घडलेला मजेदार किस्सा त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची सुरुवात चांगली झाली आहे. भारताने नागपुर कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. त्याचवेळी सामना संपल्यानंतर त्याने ट्विटरवर एक मजेदार किस्सा शेअर केला.

नागपुर कसोटीदरम्यान एका चाहत्याने अश्विनला ‘अण्णा भैया’ म्हटले होते. त्याने ट्विटरवर त्या चाहत्याला मोठा धडा दिला. अश्विनने सांगितले की, दक्षिण भारतात फक्त भैय्याला अण्णा म्हणतात. त्यांनी लिहिले की, “आज स्टेडियममध्ये कोणीतरी मला अण्णा भैया म्हटले. अण्णा आणि भैया एकच (मोठा भाऊ). मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मात्र, हे छोटेसे करेक्शन चूक सुधारण्यास मदत करेल.”

Someone at the stadium called me Anna Bhaiya today🤔🤔. Anna and Bhaiya are one and the same ( big brother ) . I am extremely grateful for the love I receive but this one small correction would help😂😂🙏

— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) February 11, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 19 कसोटीत 97 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने या प्रकरणात हरभजन सिंगला मागे टाकले. हरभजनने 18 कसोटीत 95 बळी घेतले. आता अश्विनच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आहे. कुंबळेने 20 कसोटीत 111 विकेट घेतल्या. सक्रिय खेळाडूंमध्ये अश्विनच्या मागे नॅथन लायन आहे. त्याने 23 सामन्यात 95 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने 13 कसोटीत 70 विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘ही’ भारतीय क्रिकेटपटू खेळासोबतच गायनातही आहे पारंगत, एकदा व्हिडिओ पाहाच
हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा


Next Post
Rohit Sharma

रोहितसह 'या' तीन भारतीयांनी कसोटी पदार्पणातच काढलेला विरोधी गोलंदाजांचा घाम, एक दिग्गजही यादीमध्ये

Photo Courtesy: Twitter/Gulf Giants

BREAKING: गल्फ जायंट्स ठरला इंटरनॅशनल लीग टी20 चा पहिला बादहाश

IND vs AUS Test

बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143